Gujarat ATS Saam TV
देश विदेश

मोठी बातमी! मुंबई बॉम्बस्फोटातील वॉन्टेड आरोपी गजाआड; गुजरात ATSने घेतलं ताब्यात

Mumbai Bomb Blast : अबू बकर, युसुफ भटाका, शोएब बाबा आणि सैय्यद कुरेशी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

साम टिव्ही ब्युरो

अहमदाबाद : 1993 साली मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोट (Mumbai Bomb Blast) प्रकरणात गुजरात एटीएसने मोठी कारवाई केली आहे. या बॉम्बस्फोट प्रकरणातील फरार आरोपींच्या गुजरात एटीएसने (Gujarat ATS) मुसक्या आवळल्या आहेत. अबू बकर, युसुफ भटाका, शोएब बाबा आणि सैय्यद कुरेशी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. (Gujarat ATS Arrests Four Accused In The 1993 Mumbai Serial Blasts Case)

अटक करण्यात आलेले चारही आरोपी हे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचे हस्तक आहेत. एटीएसने अत्यंत शिताफीने चारही आरोपींना अहमदाबाद येथून अटक केली आहे. 1993 साली मुंबईत बॉम्बस्फोट झाला होता. या बॉम्बस्फोटानंतर हे चारही आरोपी विदेशात पळून गेले होते. तेव्हापासून पोलीस त्यांच्या शोधात होते.

दरम्यान, चारही आरोपी बनावट पासपोर्टच्या आधारे नाव बदलून अहमदाबाद येथे आले असल्याची गुप्त माहिती एटीएसला मिळाली होती. या माहितीनंतर सापळा रचत एसटीएसने या चारही आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. गुजरात एटीएसने केलेली कारवाई ही मोठी कारवाई असल्याचं मानलं जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Crime : मुंबईत अनेक घरे; २०० पेक्षा जास्त चेले; बांगलादेशी किन्नरजवळ सापडलं कोट्यवधींचं घबाड

Maharashtra Live News Update : जालन्यातील लाचखोर आयुक्ताला कोर्टाचा दणका, जामीन फेटाळला

Telangana Band: महाराष्ट्रानंतर तेलंगणामध्ये आरक्षणाचा वाद पेटला; तोडफोडीनंतर अनेक शहरं ठप्प

अफगाण क्रिकेटपटूंच्या मृत्यूवर संतापले जय शाह, BCCI नेही केला निषेध; आता पाकिस्तानच काही खरं नाही!

Bacchu Kadu: आमदार, खासदार, पालकमंत्री, कलेक्टर मस्त ऐश करत आहेत; सुट्ट्या काढून पळाले सगळे – बच्चू कडू संतापले|VIDEO

SCROLL FOR NEXT