Gujarat Assembly Election 2022 Latest News: 2022 च्या गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. पहिल्या टप्प्यांच्या स्टार प्रचारकांची 40 जणांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीत पक्षातील बड्या नेत्यांच्या नावांचा समावेश आहे. भाजपने (BJP) या प्रचारकांची यादी निवडणूक आयोगाकडे सादर केली आहे.
स्टार प्रचारकांमध्ये पंतप्रधान मोदींपासून अमित शाह, राजनाथ सिंह, नितीन गडकरी (Nitin Gadkari), स्मृती इराणी, शिवराज सिंह, निरहुआ, रवी किशन, मनोज तिवारी, हेमा मालिनी, परेश रावल, विजय रुपाणी, नितीन पटेल यांच्या नावांचा समावेश आहे. महाराष्ट्रातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही या यादीत समावेश आहे. (Gujarat Election 2022 Latest News)
याशिवाय अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनाही या यादीत स्थान मिळाले आहे. ज्यामध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे स्टार प्रचारक असतील.
त्याचप्रमाणे गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि माजी उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांचाही समावेश करण्यात आला आहे. या दोघांनीही निवडणूक लढवण्यास नकार दिला होता. दुसरीकडे, अभिनेता परेश रावल, भोजपुरी गायक आणि पक्षाचे खासदार मनोज तिवारी यांच्याशिवाय अभिनेता-राजकारणी रवी किशन आणि गायक-राजकारणी दिनेश लाल यादव 'निरहुआ' देखील या यादीत आहेत.
गुजरात विधानसभेसाठी दोन टप्प्यात मतदान (Voting) होणार आहे. पहिल्या टप्प्यासाठी येत्या १ आणि दुसऱ्या टप्प्यासाठी ५ डिसेंबर रोजी मतदान होणार असून ८ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. गुजरातमध्ये ईशुदान गढवी 'आप'चे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असणार आहेत.
आत्तापर्यंत गुजरात विधानसभा निवडणूकीत भाजप (BJP) आणि काँग्रेसमध्ये (Congress) सामना होत आला आहे. मात्र, यंदाच्या निवडणूकीत गुजरातमध्ये पहिल्यांदाच आम आदमी (AAP) पक्षही मैदानात उतरला आहे.
गुजरात विधानसभा निवडणूक वेळापत्रक
पहिल्या टप्प्यासाठी 5 नोव्हेंबरला अधिसूचना जारी होणार
दुसऱ्या टप्प्यासाठी 10 नोव्हेंबरला अधिसूचना जारी होणार
अर्ज छाननी
पहिला टप्पा: 15 नोव्हेंबर
दुसरा टप्पा:18 नोव्हेंबर
अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख
पहिला टप्पा: 17 नोव्हेंबर
दुसरा टप्पा: 21 नोव्हेंबर
किती टप्प्यात पार पडणार मतदान: दोन टप्प्यात निवडणूक
पहिला टप्पा: 1 डिसेंबर
दुसरा टप्पा: 5 डिसेंबर
मतमोजणीची तारीख: 8 डिसेंबर
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.