बनासकांठा जिल्ह्यात SUV आणि आयसर ट्रकची भीषण धडक
सहा जणांचा जागीच मृत्यू, तीन जण जखमी
इनोव्हा कारचा पूर्णपणे चक्काचूर झाला
गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यात SUV कार आणि ट्रकची जबर धडक झाली आहे. या भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला तर तीन जण जखमी झालेत. बनासकांठा येथील अमीरगडमधील इक्बालगढजवळ ही दुर्घटना घडली. आइसर ट्रक आणि इनोव्हा कारची धडक झाल्याने सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात मृत झालेले सर्वजण राजस्थानचे रहिवासी होते. पालनपूरहून राजस्थानला जात असताना हा अपघात झाला. उर्वरित तिघांनाही उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले.
दरम्यान अपघाताची माहिती झाल्यानंतर अमीरगड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवलेत. विरुद्ध दिशेने येणाऱ्या आयसर ट्रकने कारला समोरून धडक दिली. वेगात असणारा आइसर ट्रक थेट कारवर चढला त्यानंतर उलटला.
ट्रक भरधाव वेगाने जात होता त्यामुळे ट्रक चालकाचं स्टेरिंगवरील नियंत्रण सुटलं आणि ट्रक दुसऱ्या लेनमध्ये घुसला. यामुळे एसयूव्ही कार आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली. टक्कर झाल्यानंतर ट्रक वाहनावर आदळला आणि नंतर उलटला. यामुळे गाडीतील सर्वांना गंभीर दुखापत झाली. तर सहा जणांचा जागीच मृत्यू झाला, तर काहीजण जखमी झाले.
पोलिसांनी सांगितले की, हा अपघात संध्याकाळी ७ वाजताच्या सुमारास आबू-पालनपूर महामार्गावरील इक्बालगड गावाजवळ घडला. प्राथमिक तपासानुसार गुजरातहून राजस्थानला जाणाऱ्या ट्रकची विरुद्ध दिशेने येणाऱ्या एसयूव्ही कारशी टक्कर झाली. अमीरगड पोलिस ठाण्याचे निरीक्षक पी. डी. गोहिल यांनी सांगितले की, अपघातानंतर ट्रक चालक वाहन सोडून पळून गेला आहे. "राजस्थानहून नऊ जण एसयूव्ही कारमधून पालनपूरला एका रुग्णाच्या उपचारासाठी जात होते. इक्बालगढजवळ एसयूव्हीची ट्रकशी धडक झाली. या अपघातात एका महिलेसह सहा जणांचा जागीच मृत्यू झाला."
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.