Groom Runs Away After Marriage saam tv
देश विदेश

Groom Runs Away After Marriage : गोव्याला जाऊन थाटामाटात केलं लग्न, नंतर नवरीला एअपोर्टवर सोडून नवरदेव झाला भूर्रर्र...

Groom Run Away News: गोव्यात डेस्टिनेशन वेडिंग पद्धतीने दोघांचा विवाह सोहळा थाटामाटात पार पडला. वधूच्या कुटूंबियांनी तिची पाठवणी देखील केली.

Chandrakant Jagtap

Groom Runs Away After Marriage : हुंड्यासाठी लग्न मोडल्याची घटना तुम्ही पाहिली किंवा ऐकली असेल. पण गोव्यात तर एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हुंड्यात मागितलेली वस्तू दिली नाही म्हणून वराच्या पालकांनी लग्न रद्द करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर हा सर्व प्रकार घडला. दोघांचे लग्न गोव्यात झाले मात्र तेथून निघाल्यानंतर विमानतळावर पोहोचताच मोठी घटना घडली.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, हरियाणातील एका डॉक्टर कुटुंबाशी संबंधित हे प्रकरण आहे. फरिदाबादमध्ये राहणाऱ्या या डॉक्टरच्या कुटुंबाने मुलाचे लग्न हिसार येथील एका मुलीसोबत ठरवले. याआधी या डॉक्टर मुलाने आणि मुलीने एकमेकांना ऑनलाइन पसंत केले होते. हा मुलगा नेपाळमध्ये एमबीबीएसचा कोर्स करत होता. त्याचा कोर्स संपल्यावर तो फरिदाबादला परत आला आणि वडिलांच्या हॉस्पिटल सांभाळू लागला.

दरम्यान त्याचे हिसार येथील रहिवासी असलेल्या मुलीसोबत लग्न ठरले. परंतु लग्नाला काहीच दिवस शिल्लक असताना वराच्या आई-वडिलांनी वधूच्या कुटुंबीयांवर हुंड्यात बीएमडब्ल्यू देण्यासाठी दबाव टाकला. तसेच मागणी पूर्ण केली नाही तर लग्न रद्द करू असा इशारा देखील त्यांनी दिला. परंतु वधुपित्याने कसेबसे त्यांना समजावले. त्यानंतर गोव्यात डेस्टिनेशन वेडिंग पद्धतीने दोघांचा विवाह सोहळा थाटामाटात पार पडला. वधूच्या कुटूंबियांनी तिची पाठवणी देखील केली. (Latest Marathi News)

मात्र विमानतळावर पोहोचताच वराकडी मंडळींनी वराला घेरलं आणि त्याला हुंड्याची मागणी पूर्ण न झाल्यामुळे लग्न मोडण्यासाठी भडकवले. त्यांच्या वाट्याचा लग्नाचा खर्च देखील वरपित्याने दिला नाही. दरम्यान विमानतळावरच पोहोचल्यानतंर नवरदेवाने नवरीला थोडं थांब मी लगेच येतो म्हणून तेथून निघून गेला आणि तो परत आलाच नाही. त्याने त्याचा मोबाईल देखील स्विच ऑफ केला.

यानंतर वधूकडून दागिन्यांनी भरलेली पिशवी हिसकावून वराच्या आईने देखील पळ काढला. मुलीच्या कुटुंबीयांना जेव्हा हा सर्व प्रकार समजला तेव्हा त्यांना मोठा धक्काच बसला. सध्या त्यांनी फरिदाबादच्या सेक्टर-8 पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत. (Viral News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Indurikar Maharaj Age: प्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर महाराज याचं वय किती? माहितीये का?

DNAचे जनक शास्त्रज्ञ जेम्स वॉटसन यांचं निधन; ९७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Maharashtra Live News Update: ठाकरे गट व भाजपच्या कार्यकर्त्यात धाराशिव पंचायत समिती कार्यालयात तुफान राडा

Gold Price Today: आठवड्याच्या शेवटी सोन्याच्या दरात घसरण, खरेदीची सुवर्णसंधी; वाचा १८- २२ अन् २४ कॅरेटचे आजचे दर

Dementia Risk: ३५ ते ४५ वयात ह्रदयविकाराचा झटका आल्यावर वाढतो मेंदूचा आजार? नक्की खरं काय? रिसर्च काय सांगतं?

SCROLL FOR NEXT