Marriage
Marriage  SaamTvNews
देश विदेश

रसमलाईवरून लग्नमंडपात सप्तपदीआधी घडलं अघटीत; वाद झाल्यानंतर...

वृत्तसंस्था

उत्तर प्रदेश - मुलीच्या लग्नानिमित्त घरात आनंदाचे वातावरण होते. नववधूने हाताला मेहंदी लावून आपल्या लग्नाची वाट पाहत होती. डोळ्यात हजारो स्वप्नं घेऊन नवरी मुलगी लग्नासाठी तयार झाली होती. कुटुंबात आनंदाचे वातावरण होते. लग्नाची वरातही वेळेवर पोहोचली. मात्र, लग्नाच्या वेळी अनेक वेळा अशा गोष्टींची मागणी केली जाते जी त्यावेळी पूर्ण करणे शक्य नसते. तसाच काहीसा प्रकार या लग्नात देखील घडला आहे.

हे देखील पाहा -

या लग्नाला आलेल्या नवरदेवाचे काही मित्र आणि नातेवाईक दारू प्यायले होते आणि ते वारंवार रसमलाईची मागणी करत होते. रसमलाई न मिळाल्याने वाद इतका वाढला की हे लग्नच मोडले. ही घटना उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यातील आहे. त्यानंतर प्रकरण इतकं वाढलं की अखेर पोलिसात तक्रार करावी लागली. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचं गांभीर्य ओळखून दुसऱ्या दिवशी पुन्हा या दोघाचं अर्थवट राहिलेलं लग्न लावलं.

ही घटना बुधवार 15 जून रोजी घडल्याचे सांगण्यात येत आहे. वधू पक्षाने पाहुण्यांच्या स्वागताची पूर्ण व्यवस्था केली होती. मात्र रसमलाई न मिळाल्याने वाद चांगलाच वाढला. लग्न होण्याआधीच मंडपातून मुलाचे नातलग माघारी परतले होते. यामुळे मुलीकडच्या लोकांचाही अपमान झाला होता. अखेर मुलीचे नातलग पोलिसांत गेले आणि त्यांनी याप्रकरणी तक्रार दिली.

वधू पक्षाने चार जणांविरुद्ध पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल केला. यानंतर अर्धवट राहिलेला लग्नाची विधी पोलीस तक्रारीनंतर 16 जूनला पूर्ण झाली. पोलिसांनी दोन्ही कुटुंबातील लोकांची गैरसमज दूर केली. त्यानंतर पुन्हा धूमधडाक्यात लग्न लावण्यात आलं आणि मुलीला सासरी पाठवण्यात आलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

iQOO Neo 9s Pro जबरदस्त प्रोसेसरसह भारतात होणार लॉन्च, मिळणार जबरदस्त फीचर्स; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Maharashtra Politics: सत्तेसाठी भाजप आणि काँग्रेसचा छुपा समझौता, सुजात आंबेडकरांचा आरोप

Beed News: 3 वर्ष महाविकास आघाडीच्या सरकारने रेल्वेचा पावणेचारशे कोटींचा निधी अडवला, प्रीतम मुंडेंचा गंभीर आरोप

Agricultural Commodities Export : भारताची कृषीनिर्यात ९ टक्क्यांनी घसरली, कृषीतज्ज्ञ डॉ. परशराम पाटील यांनी व्यक्त केली उच्चप्रतिच्या निर्यातीची गरज

Astro Tips: आपण देवी-देवतांच्या मंदिराला प्रदक्षिणा का मारतो? काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT