iQOO Neo 9s Pro जबरदस्त प्रोसेसरसह भारतात होणार लॉन्च, मिळणार जबरदस्त फीचर्स; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Upcoming Smartphones 2024: चीनी स्मार्टफोन निर्माता कंपनी iQOO लवकरच आपल्या देशांतर्गत बाजारात नवीन हँडसेट लॉन्च करणार आहे. जो निओ सीरीज अंतर्गत सादर केला जाईल. हा फोन iQOO Neo 9s Pro नावाने बाजारात येईल.
iQOO Neo 9s Pro
iQOO Neo 9s ProSaam Tv

iQOO Neo 9s Pro News:

चीनी स्मार्टफोन निर्माता कंपनी iQOO लवकरच आपल्या देशांतर्गत बाजारात नवीन हँडसेट लॉन्च करणार आहे. जो निओ सीरीज अंतर्गत सादर केला जाईल. हा फोन iQOO Neo 9s Pro नावाने बाजारात येईल.

कंपनीने अद्याप याच्या लॉन्च तारीख जाहीर केली नाही. मात्र लॉन्च होण्याआधीच हा फोन चीन 3c सर्टिफिकेशन साइटवर लिस्ट झाला आहे. त्यामुळे या आगामी फोनचे खास स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत.

iQOO Neo 9s Pro
Amazon Sale: स्वस्तच नाही, तर मस्तच! iPhone 14 च्या किंमतीत आणखी झाली घट, खरेदी करण्याची सुवर्णसंधी

iQOO ने वर्षाच्या सुरुवातीला iQOO Neo 9 Pro स्मार्टफोन प्रीमियम मिड-रेंज सेगमेंटमध्ये भारतीय बाजारात सादर केला होता. जो Qualcomm च्या पॉवरफुल चिपसेट आणि 120W फास्ट चार्जिंग सपोर्टसह लॉन्च करण्यात आला होता. आता कंपनी या फोनचा सब- व्हेरिएंट iQOO Neo 9s Pro लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.

असं असलं तरी हा फोन आधीपासूनच चीन 3c सर्टिफिकेशन साइटवर लिस्ट करण्यात आला आहे. त्यानुसार, या फोनमध्ये 1.5k गेमिंग डिस्प्ले आहे, जो जबरदस्त रिफ्रेश रेट आणि हाय ब्राइटनेसला सपोर्ट करण्यास सक्षम असेल. यासोबतच कंपनी यात गेमिंगसाठी डेडिकेटेड चिप देखील दिली आहे.

iQOO Neo 9s Pro
Petrol वर नाही CNG वर धावणार Bajaj ची नविन बाईक, Platina पेक्षा देणार जास्त मायलेज

iQOO Neo 9s संभाव्य स्पेसिफिकेशन्स

iQOO चा हा फोन मॉडेल नंबर V2339FA सह सर्टिफिकेशनवर लिस्ट करण्यात आला आहे. यामुळे याची पुष्टी झाली आहे की, यात 120W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करणारी बॅटरी असेल. यासोबतच कंपनीचा फ्लॅगशिप प्रोसेसर क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगन Gen 3 SoC चिपसेट यात समाविष्ट केला जाईल. एका रिपोर्टनुसार, हा फोन चीनमध्ये मेच्या मध्यात लॉन्च केला जाऊ शकतो. ज्यामध्ये ग्राहकांना 120W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करणारी 5,160mAh बॅटरी दिली जाईल. याशिवाय यामध्ये ग्राहकांना 50MP कॅमेरा देखील मिळू शकतो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com