राज्यमंत्री सतेज पाटील यांच्या नावाने व्यावसायिक महिलेला 10 लाखांना गंडा

महिलेने कामोठे पोलिस ठाणे गाठत सदर घटनेची तक्रार दाखल केली.
Satej Patil
Satej PatilSaam Tv

सिद्धेश म्हात्रे

नवी मुंबई - राज्यमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांचा नाव वापरून पुण्याच्या (Pune) व्यावसायिक महिलेची तब्बल 10 लाखांची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. आपल्या व्यवसायासाठी सुजाता चंद्र यांना मोठ्या आर्थिक गुंतवणुकीची गरज होती. मात्र, लोन उपलब्ध होत नसल्याने त्या विविध ठिकाणी प्रयत्न करत होत्या. यातच त्यांची ओळख विनायक पाटील नावाच्या इसमाशी झाली. विनायक याने आधी इन्व्हेस्टर मार्फत लोन होईल नंतर त्यासाठी कमिशन लागेल असे सांगत महिलेकडून अडीच लाख रुपये घेतले मात्र कागदपत्रात त्रुटी सांगत लोन मजूर झाले नसल्याचे सांगितले.

हे देखील पाहा -

यानंतर एका एनजीओ च्या 60 एकर जमिनीवर लोन भेटणार असून त्याची फाईल राज्यमंत्री सतेज पाटील यांच्याकडे मंजुरीसाठी गेल्याचे सांगण्यात आले. मात्र फाईल मंजुरीसाठी देखिल सतेज पाटील यांच्या पीए ला कमिशन द्यावे लागेल असे सांगून भोसले नावाच्या व्यक्ती मार्फत फोन करून फाईल मंजूर झाली असून यासाठी पैसे द्यावे लागतील असे सांगण्यात आले. यावेळी महिलेने 10 लाख रुपये कमिशन म्हणून दिले.

Satej Patil
नात्याला काळिमा! जन्मदात्या बापाकडून 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार..

मात्र तरी तात्काळ लोन होत नसल्याने महिलेला संशय आला आणि तिने विनायक पाटील यांचे घर गाठले परंतु पत्ता चुकीचा होता आणि नावही विनायक पाटील नसून विनायक रामगुडे असल्याचे समजले. यानंतर महिलेने कामोठे पोलिस ठाणे गाठत सदर घटनेची तक्रार दाखल केली. कामोठे पोलिसांनी विनायक रामगुडे विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून कामोठे पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com