Accident Saam Tv
देश विदेश

Accident : लग्नाआधी काळाचा घाला, नवरदेवाचा अपघाती मृत्यू, गर्लफ्रेंडसोबत होणार होतं लग्न

Groom dies before wedding तामिळनाडूतील मदुराई जिल्ह्यातील उसिलमपट्टी येथे घडलेल्या या घटनेमुळे होणाऱ्या नवरीसह दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

Namdeo Kumbhar

Tamil Nadu road accident today ; गर्लफ्रेंडसोबत साता जन्माच्या गाठी बांधणार होता. घरात उत्साह अन् आनंदाचे वातावरण होते. लग्नाची तयारी जोरात सुरू होती. पण लग्न घटिका जवळ येण्याआधीच काळाने घाला घातला. लग्नाला ५ दिवस राहिले होते, त्याआधीच नवऱ्याचा अपघातात मृत्यू झाला. या घटनेनंतर होणाऱ्या नवरीचा अन् कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला. आक्रोश अन् किंकाळ्याने घर शोकसागरात बुडाले. तमिलनाडूमधील उसिलमपट्टीमध्ये ही दुर्दैवी घटना घडली. (Groom dies in road accident just before wedding)

तमिलनाडूमधील मदुराई जिल्ह्यातील उसिलमपट्टी येथील तिरुवल्लुवर नगर येथील प्रसन्ना वेंकटेश हा बेंगळुरूमध्ये एका खासगी कंपनीत काम करत होता. २८ जानेवारी रोजी प्रसन्न याचं गर्लफ्रेंडसोबत लग्न होणार होते. वधू आणि वर यांच्या कुटुंबाची लग्नाची तयारी पूर्ण झाली होती. मित्र-मैत्रिणी, नातेवाईकांना लग्नाची पत्रिका पाठवण्यात आली होती. सगळ्या कुटुंबात आनंदाचे वातावरण होते, पण हा आनंद क्षणात दु:खात बदलला.

प्रसन्ना व्यंकटेश रात्री दुचाकीवरून घरी परतत येत होता. त्यावेळी टीईएलसी शाळेजवळ विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका गाडीने जोरात धडक दिली. ही घडक इतकी भयानक होती की दुचाकीचा चुराडा झाला. प्रसन्न गंभीर जखमी झाला होता. प्रसन्न याच्या डोक्याला अन् मानेला प्रचंड जखमा झाल्या होत्या. पोलीस घटनास्थळावर पोहचले, त्यांनी तात्काळ मदतकार्य हातात घेतले. वण प्रसाद याचा घटनास्थळशावरच मृत्यू झाला. पोलिसांनी प्रसन्न याचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला. त्यानंतर महामार्गावरील वाहतूककोंडी सुरळीत केली. लग्नाला अवघे पाच दिवस शिल्लक असताना नवरदेवाचा दुचाकी अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक लांबणीवर

Diabetes Care: डायबेटीज झालाय? भात खाणं सोडू नका, डॉक्टरांनी सगळ्या शंका केल्या दूर... वाचा नेमकं काय सागितलं

Weight Loss Yoga Poses: वजन कमी करण्यासाठी कोणता योगा करावा? जाणून घ्या

Reduce sugar intake: तुमच्या आहारातून शुगर इंटेक कसा कमी कराल? पाहा सोपे मार्ग

Terror Attack : लग्नात दहशतवादी हल्ला, ७ जणांचा मृत्यू, २५ जखमी, भारताचा शेजारी देश हादरला

SCROLL FOR NEXT