Rajasthan News Saam Tv News
देश विदेश

Rajasthan Wedding: चेहरा पाहून लग्नाला नकार, रागाच्या भरात होणार्‍या नवऱ्याची मिशीच कापली

Groom assaulted: वधूचा चेहरा पाहताच एका वराने लग्न मोडलंय. वराने लग्न मोडल्यानंतर वधूच्या कुटुंबाने वराला मारहाण केली. नंतर त्याच्या मिशाही कापल्या. ही धक्कादायक घटना राजस्थानमधील करौलीमध्ये घडलीय.

Bhagyashree Kamble

राजस्थानमध्ये वधूचा चेहरा पाहताच वराने लग्न मोडलंय. फोटोमध्ये वेगळी आणि प्रत्यक्षात वेगळी दिसत असल्यामुळे वराने लग्न मोडलं असल्याची माहिती आहे. वराने लग्न मोडल्यानंतर वधूच्या कुटुंबाने वराला मारहाण केली. नंतर त्याच्या मिशाही कापल्या. ही धक्कादायक घटना राजस्थानमधील करौलीमध्ये घडली असून, या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वर हा करौली पोलीस ठाणे हद्दीतील रहिवासी आहे. तो स्टेशन मास्तर म्हणून कार्यरत आहे. या प्रकरणानंतर तरूणाने वधूच्या कुटुंबावर मिशा आणि केस कापल्याचा आरोप केलाय. याप्रकरणी मुलाच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे की, वधूच्या कुटुंबियांनी आधी तरूणीचा वेगळा फोटो दाखवला होता. आता प्रत्यक्षात तरूणी वेगळी दिसत असल्यामुळे वराने लग्न करण्यास नकार दिला.

याबाबत वराने सांगितले की, कुटुंबातील सर्व सदस्य वधूच्या घरी लग्न समारंभासाठी एकत्र गेले होते. पण जेव्हा आम्ही त्या मुलीला पाहिलं, तेव्हा आम्हा सगळ्यांनाच धक्का बसला होता. कारण फोटोत दाखवलेली मुलगी प्रत्यक्षात पूर्ण वेगळी दिसत होती. त्यामुळे आम्ही लग्नाला नकार दिला. वधूच्या घरात जाऊन आम्ही, हे लग्न होऊ शकत नाही. तुम्ही आमची फसवणूक केली आहे, असं सांगितलं. त्यानंतर वधूच्या कुटुंबियांनी वराला थांबवून घेतलं.

वधूचे काका, वडील, लहान भावाने वराला थांबवून घेतलं. नंतर पंचांना बोलावून घेतलं. हे प्रकरण अपमानास्पद असल्याचं त्यांनी सांगितलं. यानंतर वधूच्या कुटुंबियांनी आमच्यासोबत वाद घालण्याचा प्रयत्न केला. भांडणाला सुरूवात झाली. वधूच्या कुटुंबियांनी वराला मारहाण केली. नंतर वराचे केस आणि मिशा कापल्याचं तरूणाने सांगितलं. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठत जबाब नोंदवून घेतला. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cyclone Alert : महाराष्ट्र पुन्हा गारठणार! चक्रीवादळामुळे बदलतंय हवामान, 'या' जिल्ह्यांना अलर्ट

8th Pay Commission: कामाची बातमी! आठव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर किती होणार? तुमचा पगार किती वाढणार? वाचा कॅल्क्युलेशन

Maharashtra Live News Update: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिक जिल्ह्यात घेणार तीन प्रचार सभा

Mars transit astrology: 18 महिन्यांनी मंगळ बनवणार खास योग; 'या' राशींवर शनीदेवाची राहणार कृपा

Local Body Election : मोठी बातमी! बारामतीमध्ये २ प्रभागांच्या निवडणुका लांबणीवर, कारण काय?

SCROLL FOR NEXT