Google Tweet About Sindhutai Sapkal Saam Tv Digital
देश विदेश

Sindhutai Sapkal: "तुझ्या प्रेमाला बंधन नाही, माई" Google ने सिंधूताईंना वाहिली श्रद्धांजली...

Sindhutai Sapkal: "तुझ्या प्रेमाला बंधन नाही, माई" आशा आणि घर शोधणाऱ्या प्रत्येकासाठी तू एक उत्तर होतीस" असं ट्विट गुगलने केलयं.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : महाराष्ट्राची मदर टेरेसा आणि ज्येष्ठ समाजसेविका पद्मश्री सिंधूताई सपकाळ यांच्या निधनानंतर अवघ्या महाराष्ट्रासह देशातून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. जगातील टॉप सर्च इंजिन कंपनी गुगलनेही (Google) सिंधूताईंना (Sindhutai Sapkal) श्रद्धांजली (Tribute) वाहिली आहे. "तुझ्या प्रेमाला बंधन नाही, माई" असं ट्विट गुगल इंडियाने केलं, तेही मराठी भाषेतून. (Sindhutai Sapkal Latest News In Marathi)

गुगलने सिंधुताईचा विकीपीडियावरील माहितीचा स्क्रीनशॉट शेयर केला आहे. ज्यात सिंधूताईंना ४ अपत्य आणि १५०० पेक्षा जास्त दत्तक घेतलेले अनाथ अपत्य असल्याचं हायलाईट करण्यात आलं आहे. सिंधूताईंनी आयुष्यभर अनाथांची सेवा करत त्यांचा मुलांप्रमाणे सांभाळ केला. त्यामुळेच गुगल सारख्या आंतरराष्ट्रीय कंपनीने त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. आपल्या ट्विटमध्ये गुगल कडून माईंबद्दल गौरवोद्गार काढण्यात आले आणि लिहिण्यात आलं की, "तुझ्या प्रेमाला बंधन नाही, माई" आशा आणि घर शोधणाऱ्या प्रत्येकासाठी तू एक उत्तर होतीस" असं ट्विट गुगलने केलयं.

पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांचं पुण्यात ४ जानेवारी रोजी रात्री ८.१० वाजता त्यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं होतं. त्यानंतर ५ जानेवारीला त्यांच्यावर महानूभव पंथानूसार शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले होते. त्यांच्या जाण्याने अनाथांची आई गेल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली आहे. (You were the answer to everyone who searched for hope and a home Google Pays Tribute To Sindhutai Sapkal)

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Andheri News : मुंबईत रेल्वे स्टेशन परिसरात पार्किंग माफियांची मुजोरी; रेल्वेच्या नियमांना हरताळ, नागरिकांची सर्रास लूट

कोचिंग क्लासची पिकनिक जीवघेणी ठरली, रायगडमध्ये समुद्रात अकोल्यातील शिक्षकासह विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

2026 मध्ये सोनं आणखी महागणार? महायुद्धानंतर शक्तिशाली नेता उदयास येणार?

Maharashtra Politics: शिवसेना भाजप संबंध तुटणार? ठाकरे- शिंदेंच्या युतीवर राणे आक्रमक

Sunday Horoscope : नातेवाईकांकडून लाभ मिळणार; 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार, अफाट पैसा येणार

SCROLL FOR NEXT