Ladli Bahina Yojana Saam tv
देश विदेश

गुड न्यूज! लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली, ३१व्या हफ्त्याचे १५०० रुपये खात्यात जमा, चेक कसं कराल?

Madhya Pradesh: मध्य प्रदेशमध्ये 'लाडली बहिना योजना'चे १५०० रुपये महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरूवात झाली आहे. हा ३१ वा हफ्ता आहे. खात्यामध्ये पैसे जमा झाल्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Priya More

मध्य प्रदेशमधील लाडक्या बहिणींसाठी आजचा दिवस खूपच आनंदाचा आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये ३१ व्या हफ्त्याचे १५०० रुपये जमा होण्यास सुरूवात झाली आहे. मुख्यमंत्री मोहन यादव यांनी ९ डिसेंबरला लाडक्या बहिणींच्या खात्यात लवकरच पैसे जमा होतील अशी घोषणा केली होती. त्यानुसार राज्यातील जवळपास १.२६ कोटी महिलांच्या बॅक खात्यात १५०० रुपये थेट हस्तांतरित करण्यात आले.

राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आणि त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी मध्य प्रदेश सरकारने 'लाडली बहना योजना' सुरू केली. सरकारचा असा विश्वास आहे की, ही योजना फक्त महिलांना आर्थिक आधार देत नाही तर त्यांना त्यांच्या कुटुंबात आणि समाजात अधिक स्वावलंबी होण्यासाठी मदत करते.

गेल्या दोन वर्षात मध्य प्रदेश सरकारची महत्वाकांक्षी ठरलेल्या लाडली बहना योजनेने लाखो कुटुंबांना आर्थिक बळकटी दिली आहे. महिलांचे असे मत आहे की, यायोजनेमुळे त्यांना त्यांच्या खर्चावर अधिक नियंत्रण मिळाले आहे आणि त्यांना लहान गुंतवणूक करण्यास सक्षम केले आहे. तर सरकारने दावा आहे की,ही योजना महिलांची सामाजिक आणि आर्थिक स्थिती सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे.

या योजनेच महिलांना मिळणारी रक्कम ही जरी कमी असली तरी यामुळे अनेकांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसंच महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी हे पैसे महत्वाचे ठरत आहे. यावेळी लाडक्या बहिणींच्या खात्यात थेट पैसे पाठवण्यात आले आहेत. प्रत्येक पात्र महिलेला १५०० रुपयांची रक्कम देण्यात आली आहे. जेणेकरून त्या त्यांच्या घराचा खर्च, मुलांचे शिक्षण किंवा इतर आवश्यक गरजा पूर्ण करू शकतील. मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी सोशल मीडियावरही माहिती शेअर केली आणि महिलांना जास्तीत जास्त या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

पुलावरून थरारक उडी! तापी नदीत बुडून 40 वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी अंत

KDMC : कल्याण-डोंबिवलीत भूमिपुत्रांची पालिकेवर धडक! २७ गावांचा क्लस्टर योजनेला विरोध, कारण काय?

युद्ध भडकलं! जगातील आणखी एका पॉवरफुल नेत्याची हत्या केल्याचा दावा

मुख्यमंत्र्यांना मोठा धक्का; निकटवर्तीयाने दिला तडकाफडकी राजीनामा, पक्षाला भगदाड

SCROLL FOR NEXT