Salary Hike Latest News SAAM TV
देश विदेश

Salary Hike : नोकरदारांसाठी खूशखबर! यावर्षी जबरदस्त पगारवाढ, किती टक्के वाढणार जाणून घ्या!

Indian Companies Increase Salary : भारतीय कंपन्या कर्मचाऱ्यांच्या पगारात यंदा भरघोस वाढ करण्याची शक्यता आहे.

Saam TV News

Salary Hike In 2023 : नोकरदार वर्गासाठी नवीन वर्षात आनंदवार्ता आहे. भारतीय कंपन्या यावर्षी कर्मचाऱ्यांच्या वेतनात सरासरी ९.८ टक्क्यांची वाढ करण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी म्हणजेच २०२२ मध्ये ९.४ टक्क्यांची वाढ केली होती. त्या तुलनेत यावर्षी देण्यात येणारी पगारवाढ थोडी जास्त आहे.

कोर्न फेरीच्या सर्वेक्षणानुसार सर्वोत्तम कुशल कर्मचाऱ्यांच्या (Employee) वेतनात यापेक्षा जास्त वाढ होण्याचा अंदाज आहे. अधिक कुशल कर्मचाऱ्यांचे व्यवस्थापन आणि विविध योजनांच्या माध्यमातून महत्वपूर्ण पावलं कंपन्यांकडून उचलली जात आहेत. (Latest Marathi News)

सर्वेक्षणात जवळपास ८ लाखांहून अधिक कर्मचारी (Worker) असलेल्या ८१८ संघटनांचा समावेश करण्यात आला होता. या सर्वेक्षणानुसार, २०२३ मध्ये भारतातील कंपन्या (Indian Companies) कर्मचाऱ्यांच्या वेतनात ९.८ टक्क्यांची वाढ करण्याची शक्यता आहे.

कोरोना महामारीच्या (Corona In India) कालावधीत २०२० मध्ये वेतनवाढ सरासरी ६.८ टक्क्यांपेक्षा कमी होती. मात्र, सध्याची स्थिती मागच्या वर्षीपेक्षा अधिक चांगली असल्याने वेतनवाढ (Salary Hike) होण्याची शक्यता अधिक आहे. लाइफ सायन्स, आरोग्य सेवा आणि उच्च तंत्रज्ञान क्षेत्रात अनुक्रमे १०.२ टक्के आणि १०.४ टक्क्यांची वाढ होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

कोर्न फेरीचे अध्यक्ष नवनीत सिंह यांनी सांगितले की, 'जगभरात मंदीचं सावट असल्याची चर्चा होत असली तरी, भारतीय अर्थव्यवस्थेच्या बाबतीत सांगायचे झाले तर, आर्थिक विकास दर (जीडीपी) ६ टक्के दराने वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.'

अधिक कुशल आणि प्रतिभावान असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी ही वेतनवाढ १५ ते ३० टक्केही असू शकते. तर अन्य क्षेत्रांसाठी ही वेतनवाढ सरासरी ९.८ टक्के, वाहन उद्योगांमध्ये ९ टक्क्यांपर्यंत होऊ शकते, असेही नवनीत सिंह यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thailand Bangkok Shooting : भर बाजारात अंदाधुंद गोळीबार! ६ जणांचा मृत्यू, हल्लेखोराने स्वतःवरही झाडली गोळी

Skin Care Tip: बटाटा लावा आणि चेहऱ्यावर आणा नैसर्गिक तेज!

Maharashtra Live News Update: पुणे शहरातील आणखी एक पूल पाण्याखाली

Pune Crime News : पुणे हादरलं !सासरवाडीत जाऊन पतीने केली पत्नीची हत्या; धक्कादायक कारण समोर

Shengdana Chikki: श्रावणात खास बनवा शेंगदाणा चिक्की, महिनाभर खाता येईल

SCROLL FOR NEXT