SSC CHSL Recruitment 2023 Saam Tv
देश विदेश

SSC CHSL Recruitment 2023: 12वी पास तरुणांना सरकारी नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी, CHSL मध्ये 1600 पदांसाठी भरती

SSC CHSL Job: या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सध्या सुरु आहे. तर 8 जून ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.

Priya More

Government Job 2023: नोकरीच्या शोधात (Job Search) असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. कर्मचारी निवड आयोग अर्थात एसएससीने (SSC) संयुक्त उच्च माध्यमिक स्तर ( CHSL) परीक्षा 2023 अंतर्गत अनेक पदांच्या भरतीसाठी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत 1600 हून अधिक रिक्त पदांसाठी नियुक्त्या करण्यात येणार आहेत. इच्छकु आणि पात्र उमेदवार ज्यांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे ते sss.nic.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकातात.

या भरती प्रक्रियेअंतर्गत निवडले झालेल्या उमेदवारांच्या नियुक्त्या भारत सरकारच्या विविध मंत्रालये/ विभाग/ कार्यालयांमध्ये निम्न विभागीय लिपिक/ कनिष्ठ सचिवालय सहाय्यक, आणि डेटा एन्ट्री ऑपरेटर या पदांवर केल्या जाणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सध्या सुरु आहे. तर 8 जून ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे. या भरती प्रक्रियेसाठी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत अधिसूचना वाचावी.

महत्वाच्या तारखा -

ऑनलाइन अर्ज करण्यास सुरुवात झालेली तारीख - 9 मे 2023

ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख - 8 जून 2023

रिक्त पदांचा तपशील -

या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 1600 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

पात्रता -

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून बारावी उत्तीर्ण किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.

वयोमर्यादा -

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 18 ते 27 वर्षांदरम्यान असावे.

पगार -

- लोअर डिव्हिजन क्लर्क (LDC)/ कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA) – वेतन स्तर - 2 (19,900-63,200 रुपये दरमहा)

- डेटा एंट्री ऑपरेटर (DEO) वेतन स्तर- 4 - (25,500 ते 81,100 रुपये दरमहा) आणि स्तर - 5 (29,200 ते 92,300 रुपये दरमहा)

- डेटा एंट्री ऑपरेटर, ग्रेड 'अ' - वेतन स्तर - 4- (25,500 ते 81,100 रुपये दरमहा)

अर्ज फी -

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना 100 रुपये अर्ज फी भरावी लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: बदलापुरात आमदार किसन कथोरेंच्या घराबाहेरील रस्त्यावर गोळीबार

PF Balance Check: आता इंटरनेटशिवायही काही सेकंदात पीएफ बॅलन्स चेक करु शकता, कसं? वाचा

मुख्यमंत्र्यांच्या 'Flying Squad'चा जुगार अड्ड्यावर छापा! ५५ गॅम्बलरला अटक; १२ लाख रोकड, ४६ मोबाईल अन् डझनभर गाड्या जप्त

America : हेलिकॉप्टरमधून पाडला नोटांचा पाऊस, मुलाने केली वडिलांची शेवटची इच्छा पूर्ण | VIDEO

Delhi Car Theft News : वाहन चालकांनो सावधान! फक्त ६० सेकंदात चोरली महागडी कार; व्हिडिओ पाहून विचारात पडाल

SCROLL FOR NEXT