
RBI Annual Report: आधीच महागाईच्या भडक्यात होरपळून निघालेल्या सर्वसामान्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 30 मे रोजी आपला वार्षिक अहवाल जाहीर केला आहे. चालू आर्थिक वर्षात भारतातील महागाई कमी होण्याची अपेक्षा आहे, असं आरबीआयने म्हटलं आहे. (Latest Marathi News)
2023-24 मध्ये मजबूत आर्थिक धोरणे आणि कमोडिटीच्या किमती कमी झाल्यामुळे भारताच्या वाढीचा वेग कायम राहिल, असंही आरबीआयने आपल्या अहवालात म्हटलं आहे. आरबीआयच्या या आर्थिक अहवालामुळे सर्वसामान्यांना थोडाफार का होईना दिलासा मिळाला आहे.
जर अल निनोचा कोणताही परिणाम झाला नाही, तर आगामी काळात महागाई घाऊक वस्तुंच्या किंती कमी होऊ शकतात. त्याचबरोबर महागाईला सुद्धा लगाम लागून शकतो, असं आरबीआयने म्हटलं आहे. जर असं झालं, तर गेल्या आर्थिक वर्षात 6.7 टक्क्यांवर असलेली घाऊक महागाई 5.2 टक्क्यांपर्यंत खाली येऊ शकते, असं सुद्धा आरबीआयने आपल्या अहवालात म्हटलं आहे. (Breaking Marathi News)
रिझर्व्ह बँकेने (RBI) मंगळवारी आपला वार्षिक अहवाल प्रसिद्ध केला. अहवालात, सेंट्रल बँकेने देशाच्या अर्थव्यवस्थेची कामगिरी आणि भविष्याबद्दल तपशीलवार चर्चा केली आहे. अहवालात म्हटले आहे की भारतीय अर्थव्यवस्थेने गेल्या आर्थिक वर्षात लक्षणीय ताकद दाखवली आहे. भारतातील अर्थव्यवस्था प्रमुख देशांमधील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून उदयास आली. मात्र, येत्या काही दिवसांत ट्रेंडमध्ये काही बदल होऊ शकतात.
गेल्या काही दिवसांपासून युरोपमध्ये मंदीने दार ठोठावले आहे. त्यामुळे आर्थिक बाजारपेठेतील अस्थिरता अलीकडे बँकिंग (Bank) संकटाच्या रूपाने दिसली आहे. या कारणांमुळे आगामी काळात देशाच्या आर्थिक विकासाचा वेग मंदावू शकतो. अशी भीती देखील आरबीआयने व्यक्त केली आहे.
दरम्यान आरबीआयच्या अहवालानुसार 2022-2023 या आर्थिक वर्षात तरतुदी आणि परकीय चलनात (Currency) विक्रमी वाढ झाली आहे. आरबीआयने या कालावधीत 1.31 लाख कोटी रुपयांची तरतूद केली होती. यातील परकीय चलन व्यवहारातून आरबीआयचा नफा 50 टक्क्यांनी वाढून 1.03 लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
Edited by - Satish Daud
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.