Gold Silver Price Today 7 March 2023 Saam TV
देश विदेश

Gold Silver Price Today : धुलीवंदनाच्या दिवशी चांदीच्या भावात वाढ; आज सोन्याचा प्रति तोळा भाव काय? जाणून घ्या

होळीच्या दिवशीही भारतीय सराफ बाजारात आज देखील सोने-चांदीच्या दरात चढ-उतार पाहायला मिळाली.

Vishal Gangurde

नवी दिल्ली : सोन्याच्या भावात गेल्या दोन वर्षात भरपूर वाढ झाली आहे. होळीच्या दिवशीही भारतीय सराफ बाजारात आज देखील सोने-चांदीच्या दरात चढ-उतार पाहायला मिळाले. सोन्याच्या दर आज प्रति तोळा ५६ हजार रुपये पार गेला आहे. तर चांदीचा भावात देखील वाढ झाल्याची पाहायला मिळाली.

दिल्ली-मुंबईत २२ कॅरट सोन्याचा भाव काय ?

दिल्लीत २२ कॅरट सोन्याचा भाव प्रति तोळा ५१,८०० रुपये आहे. तर मुंबईतील (Mumbai) सराफ बाजारात सोन्याचा (Gold) प्रति तोळा भाव हा ५१,६५० रुपये आहे. तर कोलकातामध्ये सराफ बाजारात ५१, ६५० रुपये आहे. चेन्नईत सराफ बाजारात सोन्याचा प्रति तोळा भाव हा ५२, ३५० रुपये आहे.

दिल्ली-मुंबईत २४ कॅरेट सोन्याचा भाव काय ?

दिल्लीत २४ कॅरट सोन्याचा भाव प्रति तोळा ५६,५०० रुपये आहे. तर मुंबईतील सराफ बाजारात सोन्याचा प्रति तोळा भाव हा ५६,३५० रुपये आहे. तर कोलकातामध्ये सराफ बाजारात ५६, ३५० रुपये आहे. चेन्नईत सराफ बाजारात सोन्याचा प्रति तोळा भाव हा ५७, ११० रुपये आहे.

दिल्ली-मुंबईत चांदीचा भाव काय?

दिल्लीत चांदीचा भाव ७० हजार प्रति किलो झाला आहे. तर मुंबई आणि कोलकातामध्ये चांदीचा भाव प्रति किला ६७,००० रुपये झाला आहे . चेन्नईतील सराफा बाजारात प्रति किलो चांदी ही ७०,००० रुपये आहे.

सोन्या-चांदीच्या (Gold And Silver) किंमती तुम्ही घरात बसूनही चेक करु शकता. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार, 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन तुम्हाला भाव चेक करता येईल. ज्या क्रमांकावरुन तुम्ही मॅसेज पाठवाल त्यावर किंमतींचा संदेश येईल.

शुद्ध सोने कसे ओळखावे?

सोन्याची शुद्धता तपासायची असेल, तर त्यासाठी सरकारने एक अ‍ॅप बनवले आहे. बीआयएस केअर (BIS Care) अ‍ॅपद्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अ‍ॅपपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धता तपासू शकत नाही, तर त्याच्याशी संबंधित कोणतीही तक्रारही करू शकता. हे अ‍ॅप आपल्याला प्रत्येक प्रकारे मदत करते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

OBC Vs Maratha: लक्ष्मण हाकेंना मारण्यासाठी 11 जणांची टीम, मराठा नेते आक्रमक

ST आरक्षणासाठी धनगर पुन्हा आक्रमक; आंदोलनानंतर धनगर समाजाचं आमरण उपोषण, VIDEO

Ladki Bahin Yojana : राज्यात दीड कोटी लाडक्या अपात्र? व्हायरल मेसेजमागचं सत्य काय? VIDEO

Credit Card : आरबीआयचा क्रेडिटधारकांना मोठा झटका; ही सुविधा झाली बंद, काय आहेत नवीन गाईडलाइन?

Solar Eclipse: सूर्यग्रहणाच्या वेळी कोणत्या चुका करु नये?

SCROLL FOR NEXT