Gold Silver Price 20 March 2023
Gold Silver Price 20 March 2023  Saam TV
देश विदेश

Gold Silver Price : खुशखबर! आठवड्याच्या सुरूवातीलाच सोन्याचा भाव घसरला, चांदीही झाली स्वस्त; वाचा आजचे नवे दर

Satish Daud-Patil

Gold Silver Price : तुम्ही जर स्वस्तात सोने-चांदी खरेदी करण्याची वाट पाहत असाल, तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण, आठवड्याच्या सुरूवातीलाच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली. भारतात सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे ऐन लग्नघाईत सोन्या-चांदीचे दर घसरल्याने बाजारपेठेत मोठी गर्दी झाली आहे.

आजपासून नवीन व्यावसायिक सप्ताहाला सुरुवात होत आहे. त्यामुळे आज सगळ्यांचे लक्ष आज सोने आणि चांदीच्या जाहीर होणाऱ्या नवीन दरांकडे होते. मागील आठवड्यात सोने-चांदी (Gold And Silver Price) दरात मोठी वाढ झाली होती. त्यामुळे या आठवड्यात सोन्या-चांदीचे भाव किती राहणार? याकडे खरेदीदारांचं लक्ष लागून होतं. (Latest Marathi News)

त्यातच लग्नसराईचा हंगाम सुरू असल्याने पिवळ्या धातूच्या किंमती कमी व्हाव्यात अशी, अपेक्षा सर्वसामान्यांना होती आणि घडलंही तसंच. आज म्हणजेच सोमवारी सराफा बाजार उघडताच, सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली. भावात घसरण होताच, खरेदीदारांनी बाजारपेठेत मोठी गर्दी केली.

आजचा सोन्याचा भाव काय?

मागील आठवड्याच्या शेवटच्या दिवसाच्या व्यवहाराअंती २४ कॅरेट शुद्धतेच्या १० ग्रॅम सोन्याचा दर ६० हजार ३२० इतका होता. सोमवारी सराफा बाजार उघडताच तो ५९ हजार ७८० इतका झाला. म्हणजे काय तर २४ कॅरेट शुद्धतेच्या सोन्याच्या भावात तब्बल ५४० रुपयांची घसरण झाली. याशिवाय २२ कॅरेट शुद्धतेच्या सोन्याच्या (Gold Price) भावही जवळपास ५०० रुपयांनी कमी झाला. आज सराफा बाजारात २२ कॅरेट सोन्याचे दर ५४ हजार ८०० इतके आहेत.

आजचा चांदीचा भाव काय?

दुसरीकडे सोन्यापाठोपाठ सोमवारी चांदीच्या (Silver Price) दरातही घसरण झाली. मागील आठवड्याच्या शेवटच्या दिवसाच्या व्यवहाराअंती चांदीचे दर प्रतिकिलो ७२ हजार १०० इतके होते. आज त्यात ३०० रुपयांची घट झाली. त्यामुळे १ किलो चांदीचे दर ७१ हजार ८०० रुपयांवर आले आहेत.

सोन्या-चांदीचे दर कसे ठरवले जातात?

भारतातील सोन्या-चांदीची किंमत फ्युचर्स मार्केटच्या ट्रेडिंगनुसार ठरवली जाते. ट्रेडिंग दिवसाचा शेवटचा बंद हा पुढील दिवसाचा बाजारभाव मानला जातो. मात्र, ही मध्यवर्ती संरचना आहे. यामध्ये वेगवेगळ्या शहरांमध्ये इतर काही शुल्कासह दर निश्चित केला जातो आणि त्यानंतर किरकोळ विक्रेता दागिन्यांमध्ये मेकिंग चार्जेस आकारून त्याची विक्री करतात.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election: महायुतीचा ५ जागांचा तिढा सुटला? पण नाशिकचा सस्पेन्स कायम

Dombivli Local Train Accident : डोंबिवलीतील तरुणीचा लोकलमधून पडून दुर्दैवी मृत्यू

Today's Marathi News Live : आदित्य ठाकरेंचा उद्या श्रीकांत शिंदेंच्या मतदारसंघात रोड शो

Supriya Sule on Onion | कांदा निर्यातीवर सुळे यांचा केंद्र सरकारला सवाल

Vasant More Election symbol : झोप उडवणार! वसंत मोरेंना निवडणूक चिन्ह मिळताच विरोधकांना दिला थेट इशारा

SCROLL FOR NEXT