Gold Silver Price
Gold Silver Price Saam tv
देश विदेश

Gold-Silver Rate : सोन्यासह चांदीच्या दरात मोठी वाढ; वाचा तुमच्या शहरातील आजचे दर

Ruchika Jadhav

Gold Price Today : मे महिन्यापासून लग्नसराईला जोरदार सुरूवात होते. लग्नसमारंभात सोन्या-चांदीचे दागिने खरेदी करणाऱ्यासाठी सर्वच गर्दी करतात. अशात सोने चांदीच्या दरात सातत्याने चढ उतार होताना दिसतो. आज सोने-चांदीचे दर महागले आहेत. सोन्यामध्ये आज प्रति तोळा ८३० रुपयांनी वाढ झाली आहे. आज २४ कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा ५७ हजार ०४० रुपये इतका झाला आहे. तर काल २४ कॅरट सोने प्रति तोळा ५६ हजार २१० रुपये इतके होते.(Today Gold-Silver Price)

२२ कॅरट प्रति तोळा सोन्याचा आजचा दर ५२ हजार ३०० रुपयांवर पोहचला आहे. काल २२ कॅरट प्रति तोळा सोन्याची किंमत ५१ हजार ५५० रुपये इतकी होती. लग्नासमारंभाच्या धामधूमीत सोन्याचे दर ८३० रुपयांनी वाढले आहेत. या आठवड्याच्या पहिल्या दिवशी २४ कॅरट सोने ५६ हजार ७०० रुपये इतके होते. तसेच २२ कॅरट सोन्याचा दर ५१ हजार ९५० रुपये इतका होता.

आजचे सोन्याचे दर काय आहेत.

आज १० ग्राम सोन्याची किंमत २४ कॅरटसाठी ५७ हजार ०४० रुपये इतकी आहे. तर २२ कॅरटसाठी ही किंमत ५२,३०० रुपये इतकी आहे. तसेच १ ग्रॅम २२ कॅरट सोन्याचे दर ५हजार २३० रुपये आहेत आणि २४ कॅरट सोन्याचे दर ५ हजार ७०४ रुपये इतके आहेत.

सोन्यासह चांदीच्या दरात देखील वाढ झाली आहे.

आज चांदीचे दर ६५ हजार ७०० रुपये किलो झाले आहेत.काल हेच दर ६५ हजार २५० इतके होते. कालच्या चांदीच्या दरात ४५० रुपयांनी वाढ झाली आहे.

चार प्रमुख शहरांमधील २४ कॅरट सोन्याचे दर

दिल्लीत ५७,०४० रुपये .

मुंबईत ५६,८९० रुपये.

कोलकातामध्ये सराफ बाजारात ५६,८९० रुपये.

चेन्नईत ५७,४९० रुपये.

चार प्रमुख शहरांमधील प्रति किलो चांदीचे दर

दिल्ली ६५,७०० रुपये.

मुंबई ६५,७०० रुपये.

कोलकातामध्ये ६५,७०० रुपये.

चेन्नई ६८,७०० रुपये.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuljabhavani Mandir : तुळजाभवानी मंदिरात सुरक्षा रक्षकाकडून महिला भाविकास धक्काबुक्की

Mumbai Indians Playing XI: हैदराबादविरुद्ध अर्जुन तेंडुलकरला संधी मिळणार? पाहा कशी असेल मुंबईची प्लेइंग ११

Solo Travel Tips: एकट्याने फिरायला जाण्याची आवड आहे;मग 'या' गोष्टी ठेवा लक्षात

Baramati Constituency: हे चार विधानसभा मतदारसंघ संवेदनशील जाहीर करा; राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाची मागणी

Nashik Loksabha: मनधरणी निष्फळ! शांतीगिरी महाराज अपक्ष लढण्यावर ठाम; नाशिकमध्ये महायुतीची वाट बिकट?

SCROLL FOR NEXT