Gold Silver Price 27 June 2023 Saam TV
देश विदेश

Gold Silver Price: सोन्याचा भाव दणकून आपटला, चांदीत किंचित वाढ; जाणून घ्या आजचे दर

Gold Silver Rate: मंगळवारी भारतीय बाजारपेठेत सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळाली. त्यामुळे स्वस्तात सोने खरेदी करण्यासाठी बाजारपेठा फुलल्या आहेत.

Satish Daud

Gold Siver Price Today: सोन्या-चांदीचे दर हे जागतिक बाजारातील किंमतीवर आधारभूत असतात. गेल्या काही दिवसांपासून जागतिक बाजारात सोन्या-चांदीच्या किंमती दबावाखाली दिसून येत आहे. याचा परिणाम भारतीय बाजारपेठेवर सुद्धा होत आहे. मंगळवारी भारतीय बाजारपेठेत सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळाली. त्यामुळे स्वस्तात सोने खरेदी करण्यासाठी बाजारपेठा फुलल्या आहेत.

भारतीय सराफा बाजारात मे महिन्यापासून सोने-चांदी दरात सतत पडझड सुरु आहे. आठवड्यात एकदा सोने-चांदीच्या (Gold Silver Price)  किंमतीत किंचित वाढ होते. गेल्या आठवड्यात २४ जून रोजी २२ कॅरेट शुद्धतेचे १० ग्रॅम सोने १५० रुपये तर २४ कॅरेट शुद्धतेच्या सोन्याच्या किंमतीत १६० रुपयांची वाढ झाली होती. त्यानंतर आठवड्याच्या शेवटी सोन्याचा भाव घसरला होता.

आता या आठवड्याच्या सुरूवातीला म्हणजेच सोमवारी (२६ जून) २४ कॅरेट शुद्धतेच्या सोन्याचे दर (Gold Price) १०० रुपयांनी वधारले. मात्र, मंगळवारी सराफा बाजार उघडताच त्यात १५० रुपयांची घसरण नोंदवण्यात आली. सध्या २४ कॅरेट सोन्याचे दर प्रतितोळा ५९ हजार १८० रुपये इतके आहेत.

दरम्यान, एकीकडे सोन्याचे दर कमी झाले असले, तरी चांदीच्या (Silver Price) दरात मात्र तेजी दिसून आली. मंगळवारी सराफा बाजारात चांदीचा भाव ६०० रुपयांनी वधारला. सध्या १ किलो चांदीचा भाव ७१ हजार ५०० रुपये इतका आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील दबावामुळे येत्या काही दिवसांत सोन्या-चांदीचे दर आणखी कोसळू शकतात, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

सोन्याची शुद्धता कशी तपासाल?

सोन्याची शुद्धता जाणून घेण्याची सोपी पद्धत आहे. भारतीय मानके संस्थेद्वारे शुद्ध सोन्यासाठी हॉलमार्क देण्यात येतो. २४ कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर २२ कॅरेट शुद्धतेच्या सोन्यावर ९१६ मानक अंकीत असते. २२ कॅरेट सोने जवळपास ९१ टक्के शुद्ध असते. दागिने तयार करण्यासाठी याचा वापर होतो. २४ कॅरेट सोने दमदार असते. पण त्याचा दागिने तयार करण्यासाठी वापर होत नाही.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Travel Insurance Tips: फ्लाइट रद्द होऊ द्या नाहीतर बॅग हरवू द्या; इन्शुरन्स असेल तर 'डोन्ट वरी', Travel Insurance साठी आत्ताच करा अर्ज

Maharashtra Live News Update: वरणगावचे माजी नगराध्यक्ष सुनील काळेंचं मंत्री संजय सावकारे यांचा कार्यालयाच्या दालनामध्ये ठिय्या आंदोलन

Akola Politics: भाजपची डोकेदुखी वाढली, अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली, नेमकं काय घडलं?

Pune Accident: नवले पुलावरून जाताना ब्रेक फेल, कंटेनर अनेक वाहनांना उडवत गेला; मृतांचा आकडा वाढण्याची भीती, थरकाप उडवणारा VIDEO

kalakand Recipe: संध्याकाळी गोड खायला आवडतं? मग, आज घरी नक्की बनवा हॉटेल स्टाईल कलाकंद, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT