Gold Silver Price 20 February 2023 Saam TV
देश विदेश

Gold Silver Price : धडामधूम! सोने-चांदीची किंमत झाली कमी; खरेदीपूर्वी चेक करा आजचे भाव

Satish Daud

Gold Silver Price Today : तुम्ही जर स्वस्तात सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण, आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदी दरात घसरण झाली आहे. ऐन लग्नसराईच्या हंगामात पिवळ्या धातुच्या किंमतीत घसरण झाल्याने अनेकांनी सोने खरेदी करण्यात पसंती दर्शवली आहे. (Latest Marathi News)

विशेष म्हणजे २ फेब्रुवारीनंतर सोने-चांदी ((Gold And Silver Price) दरात सातत्याने घसरण होत आहे. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रीय पातळीवर सोने-चांदीच्या दरात चढ-उताराचे सत्र सुरु आहे. देशभरात सोन्या-चांदीच्या किमती अनेक घटकांवर अवलंबून असतात. यामध्ये डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्याचाही समावेश असतो.

आजचा सोन्याचा भाव काय?

सोमवारी सराफा बाजार उघडताच, सोन्याच्या (Gold Price Today) दरात तेजी दिसून आली होती. मात्र, दुपारनंतर दरात मोठी घसरण झाली. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (एमसीएक्स) २४ कॅरेट शुद्धतेच्या सोन्याचा भाव प्रतितोळा २५३ रुपयांनी कमी झाला. त्यामुळे सराफा बाजारात २४ कॅरेट शुद्धतेच्या सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ५६ हजार १७५ इतका झाला आहे.

चांदीच्या दरातही मोठी घसरण

दुसरीकडे सोन्याबरोबरच  चांदीच्या  (Silver Price Today) दरातही मोठी घसरण दिसून आली. शुक्रवारी सराफा बाजारात चांदीचे दर तब्बल ८८९ रुपयांनी घसरले होते. सोमवारी बाजार उघडात त्यात आणखी घसरण नोंदवण्यात आली आहे. २० फेब्रुवारीला चांदीच्या दरात ४४१ रुपयांची घसरण झाल्याने सराफा बाजारात १ किलो चांदीचा दर ६५ हजार ३८९ इतका झाला आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोने-चांदीचा आजचा भाव

दुसरीकडे मात्र, सोमवारी (२० फेब्रुवारी) आंतराष्ट्रीय बाजारात सोने-चांदी (Gold Silver Rates) या दोन्ही मौल्यवान धातूच्या दरात वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. जागतिक बाजरात कमोडिटी एक्सचेंजमध्ये सोने आणि चांदी दोन्ही वाढून व्यवहार करत आहेत. सोन्याची किंमत $२.९० किंवा ०.१६% वाढून $१,८५३.१० प्रति औंस वर व्यवहार करत आहेत. तर चांदीवर नजर टाकली तर त्यात ०.२९% वाढ झाली आणि प्रति औंस $२१.७७७ दरावर कायम आहे.

शुद्ध सोने कसे ओळखावे?

सोन्याची शुद्धता तपासायची असेल, तर त्यासाठी सरकारने एक अ‍ॅप बनवले आहे. बीआयएस केअर (BIS Care) अ‍ॅपद्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अ‍ॅपपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धता तपासू शकत नाही, तर त्याच्याशी संबंधित कोणतीही तक्रारही करू शकता. हे अ‍ॅप आपल्याला प्रत्येक प्रकारे मदत करते.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shani Nakshatra Parivartan: पुढील २ महिने 'या' राशींची चांदीच चांदी! शनिदेवाच्या कृपने प्रगतीसह मिळणार यश

Lapsi Recipe : अस्सल पुणेरी आणि मऊ लापशी; या टिप्सने बनवाल तर लहान मुलं मिनिटांत ताट रिकामं करतील

Marathi News Live Updates : अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची दिवाळी होणार गोड

Bigg Boss Marathi : 'बिग बॉस'ची ऑफर स्वीकारणार का? चाहत्यांच्या प्रश्नावर मराठमोळ्या अभिनेत्रीचं एका वाक्यात उत्तर

Shocking Video: धावती ट्रेन पकडणं अंगलट, तरुण मरता-मरता वाचला; थरार CCTV कॅमेऱ्यात कैद

SCROLL FOR NEXT