Gold-Silver Price Today, Gold Silver rate
Gold-Silver Price Today, Gold Silver rate  Saam Tv
देश विदेश

Gold Price Today : सोन्याच्या दरात तेजी तर चांदीची झळाळी उतरली; जाणून घ्या आजचा भाव

साम टिव्ही ब्युरो

Gold Silver Price Today : मागील काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात सोने-चांदी दरात चढउतार होत आहे. याचाच परिणाम भारतीय सराफा बाजारावर दिसून येत आहेत. आठवड्याच्या सुरूवातीलाच सोमवारी भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या (Gold) दराने उसळी घेतली. सराफा बाजार उघडाच सोन्याचे 0.08 टक्क्यांनी वाढले. चांदीच्या (Silver) दरात मात्र घसरण दिसून आली. (Gold Silver Latest Price Today In India)

काय आहे आज सोन्याचा भाव?

आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी, सकाळी 9:10 वाजता MCX वर 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत 39 रुपयांनी वाढून 49,440 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली. आज फ्युचर्स मार्केटमध्ये सोन्याचा व्यवहार 49,350 रुपयांच्या पातळीवरून सुरू झाला. काही वेळाने किंमत 49,440 रुपयांवर पोहोचली. नंतर त्यात थोडी वाढ होऊन 49,350 रुपयांवर व्यवहार सुरू झाला.

चांदीच्या दरात घसरण

आज, मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये चांदीच्या किंमतीत लक्षणीय घट झाली आहे. चांदीचा दर आज 591 रुपयांनी घसरून 55,642 रुपये प्रतिकिलो झाला. सुरूवातीला चांदीच्या दरात तेजी दिसून आली होती. मात्र, काही काळानंतर भाव 55,537 रुपयांपर्यंत घसरला. यानंतर तो थोडा वाढला आणि 55,642 वर व्यापार सुरू झाला. (Gold And Silver Price Today)

सोन्याची शुद्धता कशी तपासावी?

सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी एक अ‍ॅप बनवण्यात आले आहे. ‘BIS Care app’ या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. तसेच या अ‍ॅपच्या मदतीने आपण फक्त सोन्याची शुद्धताच तपासू शकत नाही तर यासंबंधित तक्रारीसुद्धा नोंदवू शकतो. वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा असल्याचे आढळल्यास, ग्राहक या अ‍ॅपमधून लगेच त्याबद्दल तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदविण्याबाबतची माहितीही तत्काळ मिळणार आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hardik Pandya Troll: हार्दिकने रोहितलाच केलं प्लेइंग ११ मधून बाहेर! फॅन्सच्या संतप्त प्रतिक्रिया

Mega Block : रविवारी मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक; कोणत्या मार्गावरील सेवा असणार बंद? कोणत्या मार्गावर विशेष सेवा?

Kolhapur News: 'साम टीव्ही'चा लोगो वापरून प्रेक्षकांची दिशाभूल करणारा व्हिडिओ केला व्हायरल, अज्ञात व्यक्ती विरोधात तक्रार दाखल

Today's Marathi News Live : संभाजीनगर शहरात गॅस सिलिंडरचा स्फोटानंतर लागली आग

Special Report : कोकणात रंगणार ठाकरे विरूद्ध ठाकरे लढाई, सभांचा झंझावात

SCROLL FOR NEXT