Gold- Silver Price Today  Saam TV
देश विदेश

Gold Price Today : सोने-चांदी झाले स्वस्त; किती रुपयांनी घसरला भाव? जाणून घ्या

भारतीय सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली.

साम टिव्ही ब्युरो

Gold Silver Price Today : गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात सोने-चांदी (Gold) दरात चढ-उतार होत आहे. याचा परिणाम देशांतर्गत बाजारपेठेवर होत आहेत. बुधवारी (14 सप्टेंबर) भारतीय सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या (Silver) दरात मोठी घसरण झाली. 14 सप्टेंबर रोजी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या किमती घसरल्या आहेत. (Gold Price Today)

मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर दोन्ही मौल्यवान धातूंचे (सोन्या-चांदीचे) व्यवहार घसरणीसह सुरू झाले आहेत. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (गोल्ड रेट टुडे) वर सोन्याचा भाव 0.13 टक्क्यांनी घसरला आहे. सुरुवातीच्या व्यवहारात चांदीमध्येही घसरण दिसून येत असून किंमत 1.20 टक्क्यांनी खाली आली आहे.

MCX वर, 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा दर सकाळी 9:05 वाजता 64 रुपयांनी घसरून 50,0074 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. बुधवारी सोन्याचा व्यवहार ५०,०६९ रुपयांपासून सुरू झाला. काही वेळाने भाव 50,112 रुपयांवर पोहोचला. पण, नंतर तो किंचित घसरून 50,0074 रुपयांवर आला.

चांदी 692 रुपयांनी घसरली

मल्टी कमोडिटी एक्स्चेंजमध्ये आज चांदीच्या दरातही घसरण झाली आहे. बुधवारी चांदीचा दर 692 रुपयांनी घसरून 56,799 रुपये प्रति किलो झाला आहे. आज चांदीचा व्यवहार 57,099 रुपयांपासून सुरू झाला. काही काळानंतर किंमत वाढली आणि ती 57,649 रुपये झाली. पण ही गती टिकली नाही आणि चांदी घसरून 56,799 रुपयांवर व्यवहार करू लागली. (Gold Silver Latest Price Today In India)

आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी घसरण

बुधवारी आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली. आज सोन्याचा भाव 1.43 टक्क्यांनी घसरला आहे, तर बुधवारी चांदीचा दरही 2.73 टक्क्यांनी घसरला आहे. सोन्याची स्पॉट किंमत आज 1700.08 डॉलर प्रति औंस झाली आहे. त्याचप्रमाणे, आज आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीची स्पॉट किंमत 19.03 डॉलर प्रति औंस झाली आहे.

पितृपक्षात व्यवसाय कमी

हिंदू धर्मातील सनातन संस्कृतीत 16 दिवसांचा पितृ पक्ष पंधरवडा मानला जातो. या काळात सर्व प्रकारचे मांगलिक, वैवाहिक आणि इतर शुभ कार्ये केली जात नाहीत. पितृ पक्षाचा प्रभाव काही व्यवसायांवर जास्त तर काहींवर कमी झाला आहे. सोन्या-चांदीच्या व्यवसायावर सर्वाधिक परिणाम झाला आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: वर्सोवा बीच परिसरात महिलेला धमकी; आरोपीकडून गावठी पिस्तूल जप्त

Ethiopia Volcano: ज्वालामुखीत भस्म होणार जग? ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे भारतावर संकट?

Shocking: तिकीट तपासताना वाद, टीसीने धावत्या ट्रेनमधून ढकललं; नेव्ही अधिकाऱ्याच्या बायकोचा मृत्यू

Local Body Election: उमेदवारांसाठी आनंदाची बातमी! ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

Maharashtra Politics: राजकरणात हादरा! 2 डिसेंबरनंतर महायुती तुटणार?

SCROLL FOR NEXT