Gold- Silver Price Today  Saam TV
देश विदेश

Gold Price Today : सोने-चांदी दरात मोठी घसरण; जाणून घ्या आजचा भाव

सोने-चांदी दरात पुन्हा एकदा घसरण झाली आहे.

साम टिव्ही ब्युरो

Gold-Silver Price on 29 August 2022 : मागील काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात सोने-चांदी (Gold) दरात घसरण होत आहे. याचा परिणाम भारतीय सराफा बाजारावरही दिसून येत आहे. आठवड्याच्या सुरूवातीलाच सोमवारी भारतीय सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली. सोन्याचे दर प्रतितोळा 365 रुपयांनी कमी झाले. सोन्याबरोबरच चांदीचे (Silver) दरही प्रतिकिलो 1 हजार 27 रुपयांनी घसरले. (Gold Price Today)

आजचा सोने-चांदी भाव किती?

मल्‍टी कमोड‍िटी एक्‍सचेंजवर सोमवारी 24 कॅरेट शुद्धतेच्या सोन्याच्या दरात 365 रुपयांची घसरण झाली. त्यामुळे 24 कॅरेट सोन्याचे दर 51 हजार 385 इतके झाले. सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही घसरण झाली. चांदीचे तब्बल 1 हजार 27 रुपयांनी घसरले. सराफा बाजारात आज चांदीचा भाव प्रतिकिलो 55 हजार 301 इतका झाला. (Gold- Silver Price Today)

असा तपासा सोन्याचा भाव

आता सोन्या बरोबरच चांदीचे दरही तुम्ही घसबसल्या जाणून घेऊ शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल. त्यानंतर तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही सोन्या-चांदीचे नवीनतम दर पाहू शकता. (Silver Price Today)

सोन्याची शुद्धता कशी तपासावी?

सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी सरकारकडून एक अ‍ॅप बनवण्यात आले आहे. ‘BIS Care app’ असं या अॅपचं नाव आहे. याअ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. तसेच या अ‍ॅपच्या मदतीने आपण फक्त सोन्याची शुद्धताच तपासू शकत नाही तर यासंबंधित तक्रारीसुद्धा नोंदवू शकतो. वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा असल्याचे आढळल्यास, ग्राहक या अ‍ॅपमधून लगेच त्याबद्दल तक्रार करू शकतात.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Police Death: पोलीस दलात आत्महत्येचं सत्र काही थांबेना! ४ दिवसात ३ आत्महत्या, काय आहे कारण?

Mahalaxmi Vrat 2025 : महालक्ष्मी व्रताची तारीख, पूजा विधी, महत्व घ्या जाणून

Maharashtra Live News Update: ते वक्तव्य करून अजित पवारांकडून मला टॉर्चर करण्याचा प्रयत्न; राम शिंदेंचा आरोप

Gunfire Shooting : क्लबमध्ये अंदाधुंद गोळीबार! तिघांचा जागीच मृत्यू, आठजण जखमी

Astro Tips: सकाळी उठल्यावर आरशात पाहणे शुभ असते की अशुभ?

SCROLL FOR NEXT