Gold Silver Price Today 22 March 2023 Saam TV
देश विदेश

Gold Siver Price : सोन्याच्या भाव ६० हजारांच्या पार; चांदीच्या दरातही तेजी, झटपट जाणून घ्या आजचे दर

ऐन लग्नसराईच्या हंगामात सोने-चांदी दरात मोठी वाढ झाली आहे.

Satish Daud

Gold Siver Price on Gudi Padwa 2023 : स्वस्तात  सोने-चांदी (Gold And Silver Price) खरेदी करण्याची वाट पाहणाऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी आहे. ऐन लग्नसराईच्या हंगामात सोने-चांदी दरात मोठी वाढ झाली आहे. अमेरिका आणि युरोपमधील बँकिंग संकटामुळे जगभरातील शेअर बाजारात घसरण झाली. परिणामी भारतीय सराफा बाजारात सोन्या-चांदीचे दर झपाट्याने वाढले. (Latest Marathi News)

सोमवारी (२० मार्च) देशातील प्रमुख शहरात सोन्याने उच्चांकी ६० हजार रुपये प्रतितोळाचा टप्पा गाठला होता. पण बुधवारी (ता.२२) मात्र  सोन्याच्या (Gold Price) किंमती १ हजार रुपयांनी कमी झाल्या. २२ मार्च रोजी २४ कॅरेट सोन्याच्या किंमतीत घट होऊन किंमत ५९ हजार १९० तर २२ कॅरेटची किंमत ५४ हजार २२० रुपयांवर आल्या.

मात्र, असं असलं तरी आज मुंबईतील सराफा बाजारात सोन्याची किंमत प्रतितोळा ६० हजार इतकी आहे. दरम्यान, आज सोन्याचा भाव आतापर्यंत उच्चांकापेक्षा २९१ रुपये प्रति १० ग्रॅमने स्वस्त झाला आहे. त्याच वेळी, चांदी अजूनही त्याच्या सर्वोच्च पातळीपेक्षा ११४८१ रुपये प्रति किलो दराने स्वस्त आहे. चांदीचा आतापर्यंतचा उच्चांक ७९९८० रुपये प्रति किलो आहे.

सोन्याचे भाव का वाढत आहेत?

तज्ज्ञांच्या मते अमेरिका आणि इतर देशांमध्ये बँकिंग संकट, कमकुवत डॉलर, यासारख्या उद्वभवलेल्या परिस्थितीमुळे शेअर बाजारात घसरण होत आहे. परिणामी गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने खरेदीला पसंती देत आहे. त्यामुळे भारतात सोने- चांदीच्या (Silver Price) किंमती उच्चांकी पातळीवर गेल्या आहेत. आठवडाभरापूर्वी ५५ हजारांच्या आसपास व्यवहार करणाऱ्या सोन्याने जवळपास ६० हजारांचा टप्पा पार केला आहे.

सोन्या चांदीचे दर आणखी वाढणार?

तज्ज्ञांच्या मते, सोन्याच्या दरात यापुढेही मोठी वाढ होऊ शकते. पुढील महिन्यात सोन्याचा भाव प्रतितोळा ६२ हजारांवर पोहचू शकतो. मंदीच्या भीतीने सोन्याचे भाव चमकत आहेत. गेल्या वर्षी रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू झालेल्या युद्धानंतर देशातील सोन्याच्या दरात घसरण झाली होती. पण दिवाळीपासून सोन्याच्या किमतीला वेग आला आणि मार्च २०२३ मध्ये ऐतिहासिक उच्चांक गाठला.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

हनिमूनला जायचा विचार करताय का? भारतातील 'ही' ५ ठिकाणे आहेत प्रसिद्ध

Maharashtra News Live Updates: कार्तिकी यात्रेत विठ्ठल चरणी साडेतीन कोटींचे दान

लठ्ठपणामुळे मधुमेह होतो का? या दोघांमधील संबंध समजून घ्या...

Narayan Rane : महायुती आणि उद्धव ठाकरेंचे किती उमेदवार निवडून येतील? नारायण राणेंनी थेट आकडाच सांगितला

Diljit Dosanjh: दारूबंदी करा मग गाण्यांवर बंदी घाला, दिलजीत दोसांजचं सरकारच्या नोटिशीला उत्तर, काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT