Adani Green Stock : अमेरिकन रिसर्च फर्म हिंडेनबर्गचा अहवालानंतर अदानी समूहाचे शेअर्स मोठ्या प्रमाणावर घसरले होते. मात्र, त्यात आता पुन्हा एकदा तेजी बघायला मिळत आहे. तब्बल ८० टक्क्यांहून अधिक घसरण झालेल्या शेअर्समध्ये अचानक तेजी आल्याचं दिसून येत आहे. अदानी ग्रीन कंपनीच्या शेअर्सने अवघ्या १५ दिवसांत रॉकेट स्पीड घेतला असून गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. (Latest Marathi News)
अदानी ग्रीन कंपनीच्या शेअर्सने वाईट काळातही आपल्या गुंतवणूकदारांना खूश करण्याचे काम केले आहे. मंगळवारी, आठवड्याच्या दुसऱ्या व्यवहाराच्या दिवशी, अदानी ग्रीनच्या शेअर्सने वरच्या सर्किटला धडक दिली. बुधवारीही अपर सर्किटची प्रक्रिया सुरूच होती. अदानी समूहाच्या सर्वच कंपन्यांचे शेअर्स आज हिरव्या निशाणावर आहेत.
२८ फेब्रुवारी २०२३ रोजी अदानी ग्रीन एनर्जीच्या शेअरची किंमत ४३९.३५ रुपयांवर पोहोचली होती. या घसरणीनंतर गुंतवणूकदारांचं टेन्शन वाढलं होतं. मात्र, आता या शेअर्सने पुन्हा रॉकेट स्पीड घेतला. २१ मार्चला म्हणजेच मंगळवारी व्यवहाराच्या शेवटी तो ५ टक्क्यांच्या उसळीसह ८९१.०५ रुपयांच्या पातळीवर बंद झाला.
दरम्यान, अदानी ग्रीन एनर्जीच्या शेअरने रॉकेट स्पीड घेतला असून तो वरच्या सर्किवर पोहचला आहे. बुधवारी शेअर बाजार उघडल्यानंतर हा शेअर्स हिरव्या रंगावर व्यवहार करत होता. मात्र, ११ वाजेच्या सुमारास त्याने अचानक उसळी घेतली आणि तो अप्पर सर्किटवर पोहचला आहे.
जर एखाद्या गुंतवणूकदाराने २८ फेब्रुवारी रोजी अदानी ग्रीनच्या शेअर्समध्ये १ लाख रुपये गुंतवले असतील, तर या १५ दिवसांत त्याचे पैसे डबल म्हणजेच २ लाख झालेले असतील. आजचा शेअर बाजार बघता, अदानी समूहाच्या सर्वच कंपन्यांचे शेअर्स हिरव्या निशाणावर आहेत. अदानी समूहातील फ्लॅगशिप कंपनी अदानी एंटरप्रायजेजचा शेअर आज १,८३४ रुपयांवर खुला झाला. या शेअरमध्ये तब्बल ११ अंकांची तेजी आली असून शेअरने १,८५० रुपयांच्या उच्च पातळीलाही स्पर्ष केला आहे.
(टीप - आम्ही ही माहिती केवळ शेअर बाजारातील परफॉर्मन्सनुसार दिली आहे. बातमीचा उद्देश कोणत्याही व्यक्तीला गुंतवणूक करण्याचा सल्ला देण्याचा नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्या)
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.