Gold Silver Price Today Saam TV
देश विदेश

Gold Silver Price : आठवड्याच्या शेवटी सोन्याचे भाव घसरले, चांदीच्या दरातही मोठी घट; जाणून घ्या आजचा भाव

तुम्ही जर स्वस्तात सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे.

Satish Daud

Gold Silver Price Today : तुम्ही जर स्वस्तात सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण, सोन्याच्या किंमत घसरण झाली आहे. सराफा बाजारात सोन्या-चांदीचे दर झपाट्याने खाली आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून सोने तसेच चांदीच्या दरात वाढ होत होती. मात्र, आज दर खाली आले आहेत. (Latest Marathi News)

आजचा सोन्याच्या भाव काय?

गेल्या दोन दिवसांपासून सोन्याच्या (Gold) दरात तेजी दिसून येत होती. शनिवारी (21 जानेवारी) सुद्धा सोन्याचे दर वाढले होते. मात्र, आज सोन्याचे दर घसरले आहेत. सराफा बाजारात 24 कॅरेट शुद्धतेच्या सोन्याचा भाव 80 रुपयांनी खाली आला आहे. सध्या 24 कॅरेट शुद्धतेच्या सोन्याचा भाव 5 हजार 584 इतका आहे.

आजचा चांदीचा भाव काय?

सोन्याबरोबरच चांदीच्या (Silver) दरातही घसरण झाली आहे. 1 किलो चांदीचे दर तब्बल 200 रुपयांनी कमी झाले आहेत. रविवारी सराफा बाजार खुलताच चांदीचे दर झपाट्याने वर गेले होते. मात्र, काही वेळानंतर त्यात मोठी घसरण झाली. सध्या 1 किलो चांदीचे दर 74 हजार 300 इतके आहेत.

मिस्ड कॉल देऊन सोन्याचे दर मिळवा

सोन्या-चांदीची (Gold And Silver) किंमत तुम्ही घरबसल्या सहजपणे जाणून घेऊ शकता. यासाठी तुम्हाला फक्त 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल. तुमच्या फोनवर मेसेज येईल. त्यात तुम्ही सोन्या चांदीचे अधिकतम दर मिळवू शकता.

सोन्याची शुद्धता कशी ओळखावी?

सोन्याची शुद्धता तपासायची असेल, तर त्यासाठी सरकारने एक अ‍ॅप बनवले आहे. बीआयएस केअर (BIS Care) अ‍ॅपद्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अ‍ॅपपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धता तपासू शकत नाही, तर त्याच्याशी संबंधित कोणतीही तक्रारही करू शकता. हे अ‍ॅप आपल्याला प्रत्येक प्रकारे मदत करते.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Guru Gochar: 12 वर्षांनंतर गुरु ग्रह बनवणार केंद्र त्रिकोण राजयोग; 'या' राशींना करियरमध्ये मिळणार चांगली संधी

मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर कुणी फेकला रंग? खोडसाळपणा की महाराष्ट्र पेटवण्याचा डाव?

अतिवृष्टीमुळे पिकांची नासाडी; तोंडाशी मुलीचं लग्न,यवतमाळमधील शेतकऱ्याच्या मदतीला धावले आमदार शिवतारे, उचलणार लग्नाचा खर्च

Maharashtra Politics: फडणवीसांनी फुंकलं पालिकेचं रणशिंग, ठाकरे ब्रँडवरून राजकारण पेटलं, कुणाचा ब्रँड? कुणाचा वाजणार बँड?

वेळ येणार, धरणे आणि संपूर्ण जम्मू-काश्मीर...; पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाइंडची भारताला धमकी

SCROLL FOR NEXT