Indigo Flight News  Saam Tv
देश विदेश

गोव्याहून मुंबईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड, नौदलाने केली प्रवाशांची सुटका

गोव्यातून मुंबईला जाणाऱ्या इंडिगो विमानाचे इंजिनमध्ये बिघाड झाला.

साम वृत्तसंथा

पणजी: गोव्यातून मुंबईला (Mumbai) जाणाऱ्या इंडिगो विमानाचे इंजिनमध्ये बिघाड झाला. यानंतर नौदलाने विमानातील प्रवाशांना विमानातून सुखरूप बचावले. फ्लाइट क्रमांक 6E6097 गोव्याहून मुंबईकडे जात होती. त्यानंतर इंजिनमध्ये अचानक बिघाड झाला. यानंतर लगेच अलर्ट जारी करण्यात आला, आणि त्यानंतर नौदलाच्या बचाव पथकाने घटनास्थळी पोहोचून प्रवाशांची सुटका केली, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

या विमानात १८७ प्रवासी होते. अलिडच्या काळात विमानांमध्ये बिघाडीच्या अनेक घटना वाढल्या आहेत. रविवारी इंडिगोच्या दिल्ली-कोलकाता विमानामध्ये धूर दिसल्यानंतर कोलकाता विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. दिल्लीहून कोलकात्याला जाणाऱ्या इंडिगो एअरलाइन्सच्या विमानामध्ये रविवारी सामान ठेवण्याच्या परिसरातून धुराचा इशारा देणारा सायरन वाजला. विमान विमानतळावर उतरण्यापूर्वी ही घटना घडली.

"कोलकाता विमानतळावर उतरल्यानंतर एअरबस विमानाची चाचणी घेण्यात आली आणि सूचना चुकीची असल्याचे दिसले."दरम्यान, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. ही घटना फ्लाइट 6E 2513 मध्ये घडली यात १६५ प्रवासी आणि सहा क्रू मेंबर्स होते, असं इंडिगोने निवेदनात म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे अमित शहांसमोर लाचार झाले, ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकरांचा हल्लाबोल|VIDEO

Maharashtra Live News Update: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; निवडणुकीसदंर्भातील याचिका कोर्टाने फेटाळली

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना ट्विट करत धमकी देणारे सुशील केडिया कोण आहेत?

उपवासात मिळवा चव आणि पोषण यांचा मेळ; बनवा ही खास इडली

Dharashiv : आदिवासी समाजावर ग्रामपंचायतीचा सामाजिक बहिष्कार; सरपंच व ग्रामसेवकावर कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT