Three Sisters Die While Trying to Save Another in Nightclub Blaze Saam
देश विदेश

पहिली गोवा ट्रीप शेवटची ठरली; एकीला वाचवण्यासाठी दोघींनी घेतली आगीत उडी, तिघींचा होरपळून मृत्यू

Three Sisters Die While Trying to Save Another in Nightclub Blaze: गोवा नाईटक्लबमध्ये लागलेल्या भीषण आगीत २५ जणांचा जागीच मृत्यू. दिल्लीतील एका कुटुंबातील ४ सदस्यांचाही होरपळून मृत्यू.

Bhagyashree Kamble

गोवा नाईटक्लब येथील काल लागलेल्या आगीच्या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली. या आगीत होरपळून एकूण २५ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती आहे. ज्यात दिल्लीतील एका कुटुंबातील चार सदस्यांचा देखील समावेश आहे. एका बहिणीला धगधगत्या आगीच्या मुखातून बाहेर काढण्यासाठी दोघींनी आगीत उडी घेतली. परंतु, तिघांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर कुटुंबावर दुखा:चा डोंगर कोसळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये ३ बहिणींचा समावेश होता. अनिता, कमला आणि सरोज जोशी या तिघींचा आगीत होरपळून मृत्यू झाला. तर, भावना जोशी यांचे पती विनोद कुमार यांचेही निधन झाले. भावना जोशी यांचे अपघातातून प्राण वाचले. २ मृतदेहांची ओळख पटवणे पोलिसांना कठीण जात आहे. सध्या मृतदेहांना शवविच्छेदनासाठी रूग्णालयात पाठवण्यात आले आहे.

कुटुंबियांच्या शेजारचे म्हणाले की, 'या बहिणींच्या आईची तब्येत बिघडली आहे. त्यामुळे त्यांना मुलींच्या मृत्यूबाबत माहिती देण्यात आली नाही. आम्हाला माहित आहे की, ही महिला हा धक्का सहन करू शकणार नाही'. शेजाऱ्यांनी माहिती दिली की, घटनेच्या दिवशी रात्री ते नाईट क्लबमध्ये जेवायला गेले होते. आग लागण्याच्या आधी ते जेवण करुन बाहेर निघत होते. मात्र, सर्वजण आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पालकमंत्री जयकुमार गोरे आणि शहाजी बापू पाटील यांच्यातील वाद संपुष्टात

Famous Night Club In Goa: गोव्यात नाईटआऊटचा प्लान करताय? या प्रसिद्ध क्लबना नक्की भेट द्या

लग्नात डान्स सुरू असताना छत कोसळलं; वर बसल्या होत्या ३० महिला, काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

Maharashtra Assembly Winter Session: महाराष्ट्रात भीक मागण्यास बंदी येणार; विधानसभेनंतर विधान परिषदेतही विधेयक मंजूर

पत्त्याच्या बंगल्यासारख्या कोसळल्या २ इमारती; १९ रहिवाशांचा मृत्यू, आकडा वाढण्याची भीती

SCROLL FOR NEXT