Goa Election 2022: गोव्यातल्या 80 टक्के नोकऱ्या गोवेकरांना देणार - केजरीवाल अनिल पाटील
देश विदेश

Goa Election 2022: गोव्यातल्या 80 टक्के नोकऱ्या गोवेकरांना देणार - केजरीवाल

आपचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गोव्यात पत्रकार परिषद घेत गोव्यात नोकऱ्या आणि बेरोजगारीबाबत सात नविन घोषणा त्यांनी यावेळी केल्या.

अनिल पाटील

पणजी: आपचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गोव्यात पत्रकार परिषद घेत गोव्यात नोकऱ्या आणि बेरोजगारीबाबत सात नविन घोषणा त्यांनी यावेळी केल्या. गोव्यात आम आदमी पक्ष आगामी निवडणुकीत सत्ताधारी भाजप आणि काँग्रेसला टक्कर देण्याच्या तयारीत आहे.

हे देखील पहा -

केजरीवाल यांनी गोव्यातील जनतेला आश्वासन दिले की, आप सत्तेवर आल्यास नोकरी बाबतची भ्रष्ट प्रथा बंद करतील आणि राज्यातील तरुणांना सरकारी नोकऱ्यांमध्ये प्रवेश मिळवून देतील. प्रत्येक घरातून एका बेरोजगार व्यक्तीला नोकरी देण्याचे आश्वासन केजरीवाल यांनी गोवेकरांना दिले. कामाच्या शोधात असेलल्या लोकांना 3,000 बेरोजगारी भत्ता मिळेल असे ते म्हणाले. त्यांनी घोषित केले की राज्यातील 80 टक्के नोकऱ्या गोव्यातील लोकांसाठी राखीव असतील. सरकारी नोकरीचे नियम खाजगी क्षेत्राला लागू असतील.

२०२२ मध्ये देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. यात गोवा राज्याचे प्रभारी म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहे. त्यामुळे आता भाजप आणि कॉंग्रेसला टक्कर देण्यासाठी आम आदमी पक्षदेखील मैदानात उतरला आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: शिवनगर विद्या प्रसारक मंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला पवार काका-पुतणे एकत्र

टोकाचं पाऊल उचललेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना जिल्हाधिकाऱ्यांकडून दिवाळी सहाय्य|VIDEO

वंदे भारतला नव रुप मिळणार! स्लीपर कोचची वाट पाहणाऱ्यांचा आनंद द्विगणित होणार, ट्रेनचा आलिशान कोच कसा असणार? पाहा...

Friday Horoscope : दिवाळीची सुरुवात दणक्यात होणार; ५ राशींच्या लोकांवर होणार पैशांचा वर्षाव

Rashmika Mandanna Photos: 'काळी बिंदी काळी कुर्ती घालून ...' रश्मिकांच्या लूकने केलं घायाळ

SCROLL FOR NEXT