Ashok Chavan  Saam Tv
देश विदेश

Goa: काँग्रेस देणार 80 रुपयांना पेट्रोल, मग महाराष्ट्रात का नाही? चव्हाण म्हणाले...

पेट्रोल डिझेल मुळे किंमतींना फटका बसला आहे.

साम टिव्ही ब्युरो

प्राची कुलकर्णी

गोवा: गोव्याच्या निवडणुकांच्या प्रचारासाठी अशोक चव्हाण गोव्यामध्ये आहेत. काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात पेट्रोल- डिझेल ८० रुपयांना देण्याची घोषणा केली आहे. गोव्यात जर ८० रुपयांना पेट्रोल देता येत असेल तर महाराष्ट्रात का नाही? या प्रश्नावर बोलताना अशोक चव्हाण (Ashok Chavan) म्हणाले महाराष्ट्राची आणि गोव्याची तुलना होऊ शकत नाही. केंद्राच्या चुकीच्या धोरणामुळे पर्यटनाला फटका बसला आहे. पेट्रोल डिझेल मुळे किंमतींना फटका बसला आहे. त्यासाठी दिलासा म्हणून गोव्यामध्ये ८० रुपयांचा पेट्रोल-डिसेल देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. गोव्यामध्ये सध्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. सर्वच पक्ष प्रचार करताना दिसत आहे. आज गोव्यामध्ये प्रियंका गांधीनी प्रचारासाठी आल्या होत्या. (Petrol-Diesel Price In Goa)

दरम्यान संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवरती जोरदार टीका केली आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत काँग्रेसनं मुंबईतून मजुरांना तिकीटं काढून आपल्या राज्यात पाठवलं आणि कोरोनाचा प्रसार होईल अशी व्यवस्था केली अशी गंभीर टीका नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी संसदेत केली आहे. त्यावर सार्वजनीक बाधकाम मंत्री अशोक चव्हाण साम टीव्हीला प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधानांसारख्या जबाबदार व्यक्तींनी अशी विधानं करणं न शोभणारं आहे. अचानक लॅाकडाउन झाला. राज्य सरकारने (State Government) जे मजूर अडकले त्यांना मदत केली. केंद्राच्या बेजबाबदार वागण्याचा फटका बसला तो राज्य सरकारने सोडवण्याचा प्रयत्न केला असं स्पष्टीकरण अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी केले आहे.

शिवस्मारकाचा निर्णय न्यायप्रविष्ठ

अरबी समुद्रात होणारं छत्रपती शिवाजी महारांजांचं शिवस्मारक आजही न्यायप्रविष्ठ आहे. शिवस्मारक व्हावं ही आमची भुमिका आहे. पर्यावरणाच्या बाबतीत कोर्ट निकाल देत नाही तोवर विषय प्रलंबित राहणार. ही केस लवकर सुनावनीला घ्यावी ही आमची भुमिका आहे असे अशोक चव्हाण म्हणाले ते गोव्यात बोलत होते.

ओबीसी आरक्षणावरही चव्हाणांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ओबीसी आरक्षण मिळालं पाहीजे यासाठीच आयोग स्थापन केला आहे. जोपर्यंत निर्णय अंतीम होत नाही तोवर निवडणूका नको अशी आमची भूमिका आहे. ओबीसी आरक्षण ५० टक्के मध्ये आणलेलं आहे असे चव्हाण म्हणाले.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahihandi 2025 : दहीहंडीमध्ये २ गोविंदाचा मृत्यू; ९५ जण जखमी, कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती जण अॅडमिट, जाणून घ्या

Mumbai Lake Water Level : मुंबईकरांसाठी खूशखबर! तुळशी तलाव ओव्हरफ्लो, ७ तलावात किती पाणीपुरवठा?

Konkan Railway: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; रेल्वेनं घेतला मोठा निर्णय

Ajit Pawar Rohit Pawar : अजित पवार विरूद्ध रोहित पवार, दादांचा पुतण्याला दम

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; आणखी एका गोविंदाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT