Nandurbar Crime News Saam tv
देश विदेश

Uttar Pradesh Crime News : प्रेम आंधळं असतं, पण इतकं? बॉयफ्रेंडसोबत फोनवर बोलू दिलं नाही म्हणून मुलीने वडिलांनाच...

Daughter filled FIR against Father : मुलीच्या तक्रारीवरुन पोलिसांना वडिलांना अटकही केली आहे.

साम टिव्ही ब्युरो

Crime News : प्रेम आंधळं असतं असं म्हणतात. या प्रेमात अनेकांना रक्ताच्या नात्यांचाही विसर पडतो. अशीच एक घटना उत्तर प्रदेशातून समोर आली आहे. बॉयफ्रेंडसोबत फोनवर बोलू देत नाही म्हणून मुलीने वडिलांविरोधात पोलिसात तक्रार केली आहे. मुलीच्या तक्रारीवरुन पोलिसांना वडिलांना अटकही केली आहे.

उत्तर प्रदेशातील अयोध्या जिल्ह्यातील हे विचित्र प्रकरण आहे. रुदौली परिसरात जमुनिया माळ गावात राहणाऱ्या १९ वर्षीय तरुणीने वडिलांवर गुन्हा दाखल केला. मिळालेल्या माहितीनुसार तरुणी आपल्या प्रियकराशी मोबाईलवर बोलत होती. तेव्हा तेथे पोहोचलेल्या वडिलांनी तिला बोलण्यापासून रोखलं आणि तिला यापुढेही न बोलण्याची ताकीदही दिली. (Latest Marathi News)

वडिलांनी कुटुंबियांना मुलींवर लक्ष ठेलण्यास सांगितलं. या सर्व प्रकारामुळे संतापलेल्या मुलीने आपल्या प्रियकराला घरी बोलावले. घरातून तिने प्रियकरासह पोलीस स्टेशन गाठलं आणि वडिलांविरोधात पोलिसांत तक्रार दिली. (Crime News)

पोलीसही थक्क झाले

हा सगळा प्रकार पाहून पोलिसही थक्क झाले. त्यांनी तात्काळ मुलीच्या वडिलांना गावातून पोलीस ठाण्यात बोलावले. त्यानंतर मुलीला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र मुलगी तक्रार करण्यावर ठाम होती.

मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी

त्यानंतर मुलीच्या तक्रारीवरुन वडिलांविरुद्ध मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी देण्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शांतता भंग केल्याप्रकरणी वडिलांना अटक करण्यात आली आहे. या घटनेची उत्तर प्रदेशात चर्चा सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai : चित्रपटासाठी ५ कोटींचं कर्ज देतो..., मुंबईत प्रसिद्ध निर्मात्याला लाखोंचा गंडा

Maharashtra News Live Update: दक्षिण सोलापुरात दुष्काळाच्या झळा तीव्र; पाझर तलाव पडले कोरडे

Heart health: तुमच्या हृदयासाठी ही 1 एक्सरसाईज ठरेल बेस्ट; डॉक्टरांनी सांगितली सोपी पद्धत

Petrol saving tips: पेट्रोल पटापट संपतंय? जाणून घ्या गाडी पेट्रोलचा वापर जास्त कधी करते

Pune Accident: पुण्यात आयटी इंजिनिअरचं अपघाती निधन, भरधाव कंटेनरने दुचाकीला चिरडलं

SCROLL FOR NEXT