Donald Trump Vs Giorgia Meloni - AI saam tv
देश विदेश

Meloni Vs Trump : मेलोनी डोनाल्ड ट्रम्पवर संतापल्या; म्हणाल्या, मी कधीच कुणाकडे भीक मागत नाही!

Meloni hits back at Donald Trump : इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना खडेबोल सुनावले. मेलोनी माझ्यासोबत फोटो काढण्यासाठी अक्षरशः भीक मागत होत्या, असं ट्रम्प म्हणाले होते.

Nandkumar Joshi

आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर सहजपणे वावरत असल्यानं नेहमीच चर्चेच्या केंद्रस्थानी असलेल्या इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी आणि अवघ्या जगाचा 'बॉस' मीच आहे या अविर्भावात वावरणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात जोरदार खटके उडाले. माझ्यासोबत फोटो काढण्यासाठी भीक मागत होत्या, अशा शब्दांत खिल्ली उडवणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांचे मेलोनी यांनी चांगलेच कान पिरगळले आहेत. इटली आणि मी कधीच कुणासमोर लाचार होत नाही आणि भीकही मागत नाही हे ट्रम्प यांनी लक्षात ठेवावे, असे मेलोनी यांनी ठणकावून सांगितले.

डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले होते?

अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांची खिल्ली उडवली होती. मेलोनी या माझ्यासोबत फोटो काढण्यासाठी भीक मागत होत्या. माझ्यासोबत फोटो काढण्यासाठी त्या प्रचंड उत्सुक होत्या. मी तर असं काही करत नाही, पण मला त्यांची कीव आली, असे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते. ट्रम्प यांच्या या वक्तव्यावर मेलोनी यांनी बेधडक आणि सडेतोड उत्तर दिले आहे.

जॉर्जिया मेलोनी यांचं सडेतोड उत्तर

काही गोष्टी अशा असतात की त्यावर तात्काळ उत्तर देणे गरजेचे असते. डोनाल्ड ट्रम्प यांचं वक्तव्य काल्पनिक आहे. खरे तर हे ऐकून मी हैराण आणि त्रस्त झाले. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आपल्या सहकाऱ्यांसोबत असे वर्तन का करतात हे समजत नाही. हे असं पहिल्यांदा घडलेले नाही. ही खूप दुर्दैवाची बाब आहे इतकेच मी म्हणेन. अमेरिकेचे शत्रू असलेल्यांबद्दल ते अशी काही टिप्पणी करत नाहीत. उलट त्या नेत्यांबद्दल ते नरमाईची भूमिका घेतात. त्यांनी एक लक्षात ठेवावे की मी आणि इटली कधीच कुणासमोर विनवण्या करत नाही आणि भीक देखील मागत नाही, अशा शब्दांत मेलोनी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना ठणकावलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुणे शिक्षक निवडणुकीवरून महायुतीत घमासान; फडणवीस-शिंदेमध्ये कोल्डवॉर, वडेट्टीवारांचा दावा

ज्ञानेश, इट्स डन ब्रो! राहुल गांधींचा ठिय्या; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी इंडिया आघाडी आक्रमक

Wednesday Horoscope : मेहनीचं फळ मिळेल, ५ राशींच्या व्यक्तींचे अडथळे होतील दूर; वाचा बुधवारचे राशीभविष्य

माझ्या नादाला लागू नको! राष्ट्रवादीच्या आमदाराचा पक्ष प्रवक्त्याला इशारा; अजित पवार गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

School Timing: कोकणातील 'या' जिल्ह्यातील शाळांच्या वेळेत होणार बदल? शिक्षणमंत्र्यांना माजी आमदाराचं पत्र

SCROLL FOR NEXT