GEN Z TARGETS ETHANOL PETROL | E20 JANATA PARTY EMERGES | NEW POLITICAL STORM IN INDIA saam tv
देश विदेश

पेपरफुटीनंतर GenZच्या निशाण्यावर इथेनॉल, CJPच्या धर्तीवर E-20 जनता पार्टी

Political Storm Brewing Over Ethanol: नीट पेपरफुटीनंतर आता पेट्रोलमधील इथेनॉलवरून पुढचं आंदोलन पेटण्याची चिन्हे आहेत. त्यात विरोधकांनीही यावरून राजकारण तापवायला सुरूवात केलीय. विशेष म्हणजे इथेनॉलविरोधात नवी पार्टीही स्थापन झालीये. कोणता आहे हा नवा पक्ष? प्रधानांनंतर आता कोणता मंत्री अडचणीत येणार? पाहूयात यावरचा हा रिपोर्ट...

Saam Tv

रोहित कदम, साम टीव्ही

पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यामुळे कॉक्रोच जनता पार्टी म्हणजेच सीजेपीच्या आंदोलनाला मोठं यश मिळालं. आता तरुणाईनं इथेनॉल मिश्रित पेट्रोलच्या मुद्द्याकडे मोर्चा वळवल्याचं दिसतंय. नीट पेपरफुटी प्रकरणी ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी आंदोलनं केली, त्या ठिकाणी आता इथेनॉलवरून निदर्शने केली जात आहेत. विशेष म्हणजे इथेनॉलविरोधात लढा देण्यासाठी थेट E20 जनता पार्टीची स्थापना करण्यात आलीय. E 20 जनता पार्टीच्या मागण्या नेमक्या काय आहेत? ते पाहुयात...

E20 जनता पार्टी'च्या मागण्या

E20 ऐवजी 100 टक्के शुद्ध पेट्रोल निवडण्याचा पर्याय द्या

इथेनॉल मिश्रित इंधन असल्यास, ते स्वस्त दरात द्या

पंपांवर इथेनॉलच्या प्रमाणाचे फलक लावावेत

त्यामुळे जेनझीचा मूड पाहून विरोधकांनीही इथेनॉलचा मुद्दा हातात घेतलाय. ठाकरेबंधूंनी शिवाजी पार्कातल्या अभिनंदन सभेत पुढचा विषय इथेनॉलचा आहे, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी नाव न घेता अप्रत्यक्षपणे नितीन गडकरींना इशाराच दिला. तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी थेट गडकरींचं नाव घेत राजीनाम्याची मागणी केली...

दरम्यान, इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे संतप्त झालेल्या दिल्ली टॅक्सी असोसिएशननं येत्या 4 ऑगस्टला संसदेवर मोर्चा काढण्याची घोषणा केलीये. तर दुसरीकडे, इथेनॉलच्या मुद्य्यावरून विरोधकही सरकारविरोधात आक्रमक झाले आहेत. त्यामुळे सीजेपीच्या धर्तीवर जन्माला आलेली E20 जनता पार्टी मोदी सरकारमधील आणखी एका मंत्र्याची विकेट काढणार का? याची उत्सुकता निर्माण झालीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सोलापूरच्या उजनी धरणातून ३० हजार क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग

मुलींना नको शेतकरी नवरा, ग्रामीण महाराष्ट्रातलं भयाण वास्तव

NEETनंतर MPSCचाही पेपर फुटला? औषध निरीक्षक परीक्षेच्या पेपरफुटीचं सत्य काय?

Green Peas Cutlet: संध्याकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा टेस्टी हिरव्या मटारचे कटलेट, वाचा सोपी रेसिपी

धर्मेंद्र प्रधानांनंतर आता महाराष्ट्राच्या शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

SCROLL FOR NEXT