आयबी अधिकारी अविनाश कुमार व बहिण अंजलीने विष घेऊन आत्महत्या केली.
गोविंदपुरममधील घरात दोघेही बेशुद्ध अवस्थेत आढळले.
घटनास्थळी सुसाईड नोट न मिळाल्यामुळे तपासात अनिश्चितता.
मावशीने सावत्र आईवर छळाचे गंभीर आरोप केले आहेत.
गाझियाबादमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इंटेलिजेंस ब्युरोमध्ये (IB) कार्यरत असलेल्या २८ वर्षीय अविनाश कुमार याने आपल्या २५ वर्षीय बहिणीसह विष प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना कविनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतल्या गोविंदपुरम एच ब्लॉक भागात घडली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
२८ वर्षीय अविनाश दिल्लीतील इंटेलिजेंस ब्युरोमध्ये अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्याची बहीण अंजली देखील एका खासगी कंपनीत कार्यरत होती. ही घटना कविनगर पोलीस स्टेशन हद्दीतील गोविंदपुरम भागातील रहिवासी आहे. गोविंदपुरम एच ब्लॉकमध्ये राहणारे सुखबीर सिंग यांचा २८ वर्षीय मुलगा अविनाश कुमार दिल्लीच्या गुप्तचर विभागाच्या कार्यलयात होते.
अविनाश आणि त्याची २५ वर्षीय बहीण यांनी गुरूवारी सायंकाळी विष पिऊन स्वत:ला संपवलं. त्यांची प्रकृती बिघडल्यानं कुटुंबाला धक्का बसला. कुटुंबानी तातडीने दोघांनाही कविनगर येथील सर्वोदय रूग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.
या घटनेसंदर्भात कविनगरचे एसीपी भास्कर वर्मा म्हणतात, 'पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच तपासाला सुरूवात केली. तपासादरम्यान, पोलिसांना कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही. संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू आहे. दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे. मृत भाऊ -बहिणीचे वडील सुखबीर सिंग हे सरकारी विभागात अधिकारी आहेत. तर, सावत्र आई एका सरकारी शाळेत शिक्षिका आहेत'.
घटनेबाबत अविनाशच्या सावत्र आईने सांगितले की, 'गुरूवारी सायंकाळी मी बाहेर होते. ५ वाजता घरी परतले. तेव्हा दोन्ही मुले घरी होती. त्यावेळी फोन केला. फोन करूनही कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. शेजाऱ्यांनी मदत केली. त्यांनी दरवाजा तोडला. तेव्हा भाऊ - बहीण दोघेही बेशुद्ध अवस्थेत आढळले'.
अविनाशची मावशी रेखा म्हणतात, 'अविनाशची आई २००७ साली वारली. त्यानंतर त्याच्या वडिलांनी दुसरं लग्न केले. सावत्र आई दोघांचाही छळ करत होती. यामुळे दोघांनीही आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला'. अविनाशच्या मावशीनं केलेल्या आरोपांमुळे पोलीस त्याच दिशेने तपास करीत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.