Air Strike On Gaza Hospital X (Twitter)
देश विदेश

Air Strike On Gaza Hospital : गाझाच्या हॉस्पिटलवर इस्राइलचा एअर स्ट्राइक; ५०० नागरिकांच्या मृत्यूचा हमासचा दावा

Air Strike On Gaza : इस्राइलच्या सैन्याने गाझामधील एका हॉस्पिटलर हवाई हल्ला केला असून, त्यात ५०० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाल्याचा दावा हमासने केला आहे.

साम टीव्ही न्यूज नेटवर्क

Israel-Hamas war Updates :

इस्राइल आणि हमासमधील युद्ध अधिकच पेटले आहे. इस्राइलच्या सैन्याने गाझामधील एका हॉस्पिटलर हवाई हल्ला (Air Strike) केला असून, त्यात ५०० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाल्याचा दावा हमासने केला आहे.

इस्राइल आणि हमासच्या युद्धात आतापर्यंत दोन्हीकडील चार हजारांहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. तर दहा लाखांहून अधिक नागरिकांनी उत्तर गाझा सोडल्याचे वृत्त आहे.  (Latest Marathi News)

हमासच्या दाव्यानुसार, हा हवाई हल्ला मध्य गाझाच्या अल अहली हॉस्पिटलवर झाला आहे. गाझा आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, मंगळवारी इस्राइलच्या सैन्याने अल अहली हॉस्पिटलवर हवाई हल्ला केला. या हॉस्पिटलमध्ये मोठ्या संख्येने जखमींनी आणि पॅलेस्टिनींनी आश्रय घेतला होता.

अल अहली हॉस्पिटलवर एअर स्ट्राइक झाल्यानंतर इमारतीला मोठी आग लागली होती. आगीचे लोळ बाहेर पडत असल्याचे छायाचित्रांतून दिसत होते. तर आजूबाजूला सर्वत्र मोठ्या प्रमाणात काचा विखुरल्या होत्या. हॉस्पिटलच्या परिसरात अनेक नागरिक मृत्युमुखी पडलेले होते. या हल्ल्यात आतापर्यंत ५०० नागरिकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.

पॅलेस्टाइलनने या हवाई हल्ल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. इस्राइल सैन्याच्या विमानातून गाझाच्या हॉस्पिटलवर मोठ्या प्रमाणात बॉम्बफेक केली. त्यात अंदाजे ५०० नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्यात महिला आणि लहान मुलांचा समावेश असल्याचे पॅलेस्टाइनकडून सांगण्यात आले.

इस्राइलकडून अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. जर त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला तर, हा इस्राइलने केलेला सर्वात मोठा हल्ला असेल, असे बोलले जाते. इस्राइलच्या सैन्याच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, हॉस्पिटलवरील हवाई हल्ल्याबाबत आणि त्यात मोठ्या संख्येने नागरिक मृत्युमुखी पडल्याच्या वृत्ताबाबत कोणतीही माहिती नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: बारामतीमध्ये जय पवार बाईक रॅलीमध्ये सहभागी

१२ डिसेंबरपासून राजासारखं आयुष्य जगणार 'या' राशी; आर्थिक फायद्यासह चांगल्या संधीही मिळणार

Cotton Price : कापसाला मिळाला साडेसात हजाराच्यावर दर; पहिल्याच दिवशी २५०० क्विंटलची आवक

Kashmera Shah Accident: कृष्णा अभिषेकच्या पत्नीचा परदेशात झाला भीषण अपघात, फोटो शेअर करत म्हणाली, जखमांचे व्रण...

GRAP-4 लागू करण्यास तीन दिवसांचा विलंब का? दिल्लीतील प्रदूषणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने घेतला कठोर निर्णय

SCROLL FOR NEXT