Congress vs BJP  Saam tv
देश विदेश

Congress vs BJP : अदानी समुहावर लाच दिल्याचा आरोप; काँग्रेस आणि भाजपमध्ये वार-पलटवार, कोण काय म्हणाले?

Congress vs BJP on adani group : अदानी समुहावर लाच दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावरून काँग्रेस आणि भाजपमध्ये वार-पलटवार झाला आहे.

Vishal Gangurde

मुंबई : उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर अमेरिकेत गुंतवणुकीत घोटाळा केल्याचा आरोप आहे. अदानी समूहाने कॉन्टिनेंटमध्ये सोलर प्रकल्पाचं कंत्राट आणि फायनान्ससाठी लाच दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गौतम अदानी यांच्यासहित पंतप्रधान मोदींवर जोरदार निशाणा साधला आहे.

राहुल गांधी यांनी पुढे म्हटलं की, 'अमेरिकेत अदानींनी गुन्हा केला आहे. त्यांनी २ हजार कोटींचा घोटाळा केला आहे. परंतु भारतात गौतम अदानी यांचं कोणी काही करु शकत नाही. खरंतर गौतम अदानी यांना अटक केली पाहिजे. माधुरी बुच यांना पटावरून हटवलं पाहिजे. त्याची चौकशी केली पाहिजे. पंतप्रधान नरेद्र मोदी हे त्यांचा १०० टक्के बचाव करत आहेत.

राहुल गांधी यांनी आरोप केल्यानंतर भाजपने पलटवार केला आहे. भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी म्हटलं की, गौतम अदानी यांनी तेलंगणामध्ये काँग्रेसच्या रेवंत रेड्डी सरकारला १०० कोटी रुपये दान दिले होते. पात्रा यांनी पुढे म्हटलं की, 'राहुल गांधी यांनी खरंतर तेलंगणावर बोलावं. भारतीय बाजारात आघात करण्यासाठी जॉर्ज सोरोस यांची आंतरराष्ट्रीय स्ट्रक्चर काम करत आहे. हे काँग्रेसचं आंतरराष्ट्र स्ट्रक्चर आहे'.

'१९ ऑक्टोबर २०१४ रोजी अंदानी फाऊंडेशनने तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना कौशल्य विकासासाठी १०० रुपये कोटींचं दान दिलं आहे. तर प्रश्न असा आहे की, 'एका भ्रष्ट व्यक्तीकडून काँग्रेसच्या सरकारने दान का घेतलं? असा सवाल संबित पात्रा यांनी म्हटलं आहे.

पात्रा यांनी पुढे म्हटलं की, 'इल्हान ओमर आणि जॉर्ज सोरोस हे काँग्रेसचं आंतरराष्ट्रीय स्ट्रक्चर आहे. त्यांचे हेतू आम्हाला माहीत आहे. त्यांचा हेतू भारतीय बाजारावर आघात करण्याचा आहे. भारताची अर्थव्यवस्था जगात चौथ्या क्रमांकावर आहे. भारताची अर्थव्यवस्था लवकरच तिसऱ्या क्रमांकावर पोहोचू शकते. हीच बाब काँग्रेसला सहन होत नाही'.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai : मुंबईच्या गोंगाटातून थोडी शांती हवीय? 'हे' पुरातन मंदिर ठरेल बेस्ट

Maharashtra News Live Updates: सत्ता आपली आली आहे, कामं करत राहा, अजित पवारांचा पराभूत झालेल्या उमेदवारांना दिलासा

Manoj Jarange Patil: ...तर पुन्हा मराठे छाताडावर बसणार, मनोज जरांगे पाटील यांचा महायुतीला इशारा

पुण्यात कोणाला मिळणार मंत्रीपद? ७ नावं चर्चेत

Kannad Result : पत्निकडून पतीचा पराभव, कन्नड मतदार संघात संजना जाधव विजयी

SCROLL FOR NEXT