Gautam Adani Saam Tv
देश विदेश

गौतम अदानी जगातील तिसरे श्रीमंत व्यक्ती बनणारे पहिले आशियाई बनले

137.4 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह, गौतम अदानी यांनी फ्रान्सच्या बर्नार्ड अर्नॉल्ट यांना मागे टाकले आहे.

साम वृत्तसंथा

नवी दिल्ली: ब्लूमबर्ग अब्जाधीशांच्या निर्देशांकानुसार, भारतीय अब्जाधीश गौतम अदानी (Gautam Adani) यांनी फ्रान्सच्या बर्नार्ड अर्नॉल्ट यांना मागे टाकून जगातील तिसरे सर्वात श्रीमंत अब्जाधीश बनले आहेत. ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकाच्या पहिल्या तीनमध्ये आशियाई व्यक्तीने प्रवेश करण्याची ही पहिलीच वेळ आहे. 137.4 अब्ज डॉलर संपत्तीसह, गौतम अदानी यांनी फ्रान्सच्या बर्नार्ड अर्नॉल्टला मागे टाकले आहे आणि आता ते केवळ एलन मस्क आणि अमेरिकेच्या जेफ बेझोस यांच्या क्रमवारीत मागे आहेत.

बर्नार्ड जीन-टिएन अर्नॉल्ट हा एक फ्रेंच व्यापारी, गुंतवणूकदार आणि कला संग्राहक आहे. ते LMVH चे सह-संस्थापक, अध्यक्ष आणि CEO आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे ​​चेअरमन मुकेश अंबानी 91.9 अब्ज डॉलर संपत्तीसह 11 व्या क्रमांकावर आहेत.

2022 मध्ये 60.9 अब्ज डॉलरची वाढ

ब्लूमबर्ग अब्जाधीश इंडेक्सनुसार गेल्या महिन्यात भारतीय अब्जाधीश गौतम अदानी (Gautam Adani) यांनी बिल गेट्स यांना मागे टाकून जगातील चौथे अब्जाधीश बनले आहेत. 2022 मध्ये अदानी यांनी त्यांच्या संपत्तीमध्ये 60.9 अब्ज डॉलरची भर पडली आहे, जी इतर कोणाहीपेक्षा पाचपट अधिक आहे. त्यांनी फेब्रुवारीमध्ये सर्वात श्रीमंत आशियाई म्हणून मुकेश अंबानींना मागे टाकले, एप्रिलमध्ये अब्जाधीश झाले आणि गेल्या महिन्यात मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशनच्या बिल गेट्स यांना मागे टाकून जगातील चौथ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती बनले.

बिल गेट्स आणि वॉरन बफे यांसारख्या अब्जाधीशांनी आपली संपत्ती दान करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे मायक्रोसॉफ्टचे प्रमुख आणि जगातील सर्वात मोठे गुंतवणूकदार वॉरन बफे यांच्या संपत्तीत घट झाली आहे. ज्याचा फायदा अब्जाधीशांच्या यादीत गौतम अदानींना (Gautam Adani) झाला आहे. गेट्स यांनी बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशनला 20 अब्ज डॉलर हस्तांतरित केले. यावेळी वॉरन यांनी यापूर्वीच धर्मादायतेसाठी 35 डॉलर अब्ज पेक्षा जास्त देणगी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

WhatsApp New Feature: व्हॉट्सॲप चॅटमध्ये बदल होणार, वापरकर्त्यांना 'हे' नवीन अपडेट मिळणार

Pune Shocking: 'आई-बाबा माफ करा'! ७ व्या मजल्यावरून उडी मारण्यापूर्वी IT इंजिनिअर पियुषची भावनिक चिठ्ठी

Maharashtra Live News Update: भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिरात भाविकांच्या गर्दीचा उद्रेक

Government Employee : सरकारी कर्मचाऱ्यांनो, सोशल मीडिया वापरताना जरा जपून; अन्यथा कारवाई, नवी नियमावली आली!

Fried Rice Recipe: रात्रीचं जेवण बनवायचा कंटाळा आला आहे? 10 मिनिटांत बनवा हेल्दी आणि टेस्टी फ्राई़ड राईस

SCROLL FOR NEXT