एलपीजीच्या पुरवठ्याबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय
सरकारकडून ५ किलो सिलिंडरचा पुरवठा दुप्पट
स्थलांतरित आणि विद्यार्थ्यांना मोठा दिलासा
ओळखपत्र दाखवून मिळणार सिलिंडर
इराण - इस्राइलमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे भारतासह जगभरातील अनेक देशांना फटका बसत आहे. या युद्धामुळे एलपीजी गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे. भारतात सिलिंडरच्या तुटवड्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. या संकटादरम्यान केंद्र सरकारने गॅस सिलिंडरबाबत आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. सरकारच्या निर्णयानुसार आता ५ किलोच्या गॅस सिलिंडरची संख्या दुप्पट केली आहे. म्हणजे तुम्हाला डबल सिलिंडर मिळणार आहे. केंद्र सरकारच्या या नियमामुळे प्रवासी, स्थलांतरीत कामगार, विद्यार्थी आणि रोजंदारीवर काम करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
केंद्र सरकारने राज्यांसाठी ५ किलोच्या छोट्या गॅस सिलिंडरचा कोटा दुप्पट केला आहे. म्हणजेच तुम्हाला स्वयंपाकासाठी गॅस सिलिंडर मिळवण्यासाठी आता धावपळ करावी लागणार नाही. त्याचसोबत काळ्या बाजारात हा सिलिंडर खरेदी करण्यासाठी तुम्हाला जास्त पैसे मोजावे लागणार नाही. केंद्र सरकारने सर्व राज्यांना पत्र पाठवून गॅस सिलिंडरचे दैनंदिन वाटप दुप्पट करण्याचे आदेश दिले आहेत.
स्थलांतरित कामगार, मजूर आणि विद्यार्थ्यांसाठी गॅस कनेक्शन मिळवणे अनेकदा डोकेदुखी ठरते. कारण त्यांच्याकडे पत्त्याचा पुरावा नसतो. या समस्येवर उपाय म्हणून, सरकारने ५ किलोच्या सिलेंडरचा पुरवठा सुरू केला आहे. हा सिलिंडर खरेदी करणं देखील सोपं केले आहे. यासाठी तुम्हाला कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता लागणार नाही. फक्त तुमचे ओळखपत्र दाखवून तुम्ही तो खरेदी करू शकता.
हे ५ किलोचे एफटीएल सिलिंडर राज्य सरकारांना आणि त्यांच्या अन्न व नागरी पुरवठा विभागांना पुरवले जातील. याचे वितरण फक्त तेल विपणन कंपन्यांमार्फत स्थलांतरीत कामगार, विद्यार्थी, रोजंदारीवर काम करणाऱ्यांना केले जाईल. मध्य पूर्वेमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे एलपीजीच्या पुरवठ्यावर गंभीर परिणाम झाला आहे. यामुळे गरीब आणि मध्यमवर्गीयांची गैरसोय होऊ नये. त्यांना वेळेत गॅस सिलिंडर मिळावे यासाठी केंद्र सरकार वेळोवेळी महत्वपूर्ण पाऊलं उचलत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.