Gas Cylinder Saam tv
देश विदेश

Gas Cylinder: 'या' राज्यात 'अच्छे दिन'; अवघ्या 500 रुपयात मिळणार गॅस सिलेंडर

1 एप्रिलपासून 12 सिलेडरसाठी 1040 रुपयांऐवजी एका वर्षात त्यांना 500 रुपयांना मिळतील.

साम टिव्ही ब्युरो

जयपूर : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या राजस्थानमध्ये आहे. या यात्रेअंतर्गत राजस्थानमधील अलवरमध्ये एका मोठ्या सभेचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी राजस्थानच्या जनतेसाठी मोठी घोषणा केली. एप्रिलपासून 1040 रुपयांचा गॅस सिलिंडर 500 रुपयांना मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. याबाबतची घोषणा ते आपल्या अर्थसंकल्पात करणार आहेत. (Gas Cylinder)

अलवरमध्ये मुख्यमंत्री गेहलोत म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उज्ज्वला योजनेच्या नावाखाली गरिबांना एलपीजी कनेक्शन आणि स्टोव्ह देण्याचे नाटक केले. आज ते कोणीही भरत नसल्याने रिकामेच आहेत, कारण सिलिंडरचे दर 400 रुपयांवरून 1040 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. (Latest Marathi News)

मी माझ्या अर्थसंकल्पात घोषणा करणार आहे. जे लोक दारिद्र्य रेषखाली आहेत, गरीब आहेत, उज्ज्वला योजनेशी संबंधित आहेत, त्यांचा या श्रेणीसाठी अभ्यास केला जाईल. त्यानंतर 1 एप्रिलपासून 12 सिलेडरसाठी 1040 रुपयांऐवजी एका वर्षात त्यांना 500 रुपयांना मिळतील.

सध्याच्या महागाईच्या काळात तुमच्यासाठी जे काही करता येईल ते आम्ही करू. आज पीठ, डाळ, तांदूळ, तेल यासह सर्वच वस्तू महाग झाल्या आहेत. मी येत्या काही महिन्यांत अशी योजना आणू इच्छितो जी गरिबांच्या या गरजा पूर्ण करू शकेल. अशा प्रकारे आपण एकापाठोपाठ एक पाऊल टाकत महागाईचा विळखा संपवू, असं देखील गेहलोत यांनी सांगितलं.

येत्या काळात आम्ही 4 ते 5 लाख तरुणांना रोजगार देण्याचे काम करू. राजस्थान सरकार हे पहिले राज्य सरकार आहे ज्याने 1.35 लाख तरुणांना रोजगार देण्याचे काम केले आहे. 1.25 लाख पदांसाठी नोकऱ्या देण्याचा प्रकल्प सुरू आहे, मुलाखती सुरू आहेत, परीक्षा सुरू आहेत, अशी माहिती देखील गेहलोत यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Election Commission: पुरावं मागितले तर उत्तर आलं नाही; राहुल गांधींकडून संविधानाचा अपमान: निवडणूक आयोग

Maharashtra Politics : खान्देशात काँग्रेसला धक्का! प्रतिभा शिंदेंचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश, VIDEO

Bhivtas Waterfall : पाचशे फुटांवरून झेपावणारा भिवतास वॉटर फॉल; निसर्गप्रेमींसाठी स्वर्गच!

Tejaswini Pandit: 'आई...' एवढेच उच्चारले अन् तेजस्विनी पंडित ढसाढसा रडली…; हृदय पिळवटून टाकणारा क्षण, VIEDO

केवळ चपातीच नाही तर तुम्ही गव्हाच्या पीठापासून बनवू शकता 'हे' टेस्टी फूड्स

SCROLL FOR NEXT