Ganeshotsav : मराठी बांधवांनी पाकिस्तानात साजरा केला गणेशोत्सव (पहा VIDEO)
Ganeshotsav : मराठी बांधवांनी पाकिस्तानात साजरा केला गणेशोत्सव (पहा VIDEO)  साम टीव्ही
देश विदेश

मराठी बांधवांनी पाकिस्तानात साजरा केला गणेशोत्सव (पहा VIDEO)

सुमित सावंत, साम टीव्ही, मुंबई

कराची : पाकिस्तानातील कराची शहरात असलेल्या मराठी बांधवांकडून दर वर्षी हिंदूंचे सगळेच सण मोठ्या उत्साहात साजर केले जातात. यंदा देखील बाप्पाचं आगमन कराचीत असलेल्या रतनेश्वर महादेव मंदिर येथे झालं आहे. विधिवत पूजा करून बाप्पाची प्राणप्रतिष्ठापणा करण्यात आली आहे.

कराची हे पाकिस्तानमधील एकमेव असे ठिकाण आहे जिथे मराठी लोक मोठ्या प्रमाणावर राहतात. सुमारे 150 मराठी कुटुंबे अजूनही कराचीमध्ये सध्याच्या घडीला राहात आहेत. मराठी माणसांचे श्री महाराष्ट्र पंचायत कराची मंडळ कराचीत आहे. या मंडळाकडून प्रत्येक वर्षी होळी, जत्रा, पूजा, गणेश पूजा, सतारायण कथा, आयोजित केल्या जातात. पाकिस्तानातील कराची हे एकमेव शहर आहे ज्या ठिकाणी मराठी लोक मोठ्या प्रमाणात राहतात.

इथे विविध समाजाचे लोक हिंदू सणांमध्ये सामील होतात. स्वातंत्र्यापूर्वी कराचीमध्ये 25,000 मराठी भाषिक लोक राहत होते. पाकिस्तानी नागरिक असले तरी त्यांना त्यांच्या संस्कृतीचा आणि परंपरांचा प्रचंड अभिमान आहे आणि म्हणूनच इथे सगळे हिंदूंचे सण मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. त्यामुळेच यंदा चा गणेशोत्सव देखील मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Benifits of Ghee: जेवणामध्ये एक चमचा तूप; शरीराला आरोग्याचे वरदान

Maharashtra Politics: उद्धव ठाकरे यांनी दिघेंना ठाणे जिल्ह्याचं अध्यक्षपद सोडायला भाग पाडलं, मुख्यमंत्री शिंदेंचा गंभीर आरोप

Today's Marathi News Live: भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्याविरोधात गुन्हा दाखल

Sanjay Raut | कशाचा शोध घेतायत संजय राऊत?

Avinash Jadhav: खंडणीच्या आरोपानंतर अविनाश जाधवांची पहिली प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT