Punjab Crime News Saam tv news
देश विदेश

Crime: दुचाकीवरून आले अन् बेछूट गोळीबार; कुख्यात गुंडाच्या आईची भररस्त्यात हत्या, बॉडीगार्ड रक्तबंबाळ

Jaggu Bhagwanpurias Family Targeted: पंजाबमधील बटालामध्ये गँगस्टर जग्गू भगवानपुरियाच्या आई आणि बॉडीगार्डची अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून, टोळीविरोधातील हिंसा समोर आली आहे.

Bhagyashree Kamble

पंजाब बटाला येथील कादियन रोडवरील एका बेकरीजवळ गँगस्टर जग्गू भगवानपुरियाची आई आणि त्याच्या बॉडीगार्डची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेनंतर अज्ञात आरोपी दुचाकीवरून फरार झाले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून, प्राथमिक माहितीनुसार ही हत्या गँगवॉरशी संबंधित असल्याचं सांगितलं जात आहे. दविंदर बंबीहा टोळीने या हत्येची जबाबदारी स्वीकारली असून, घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं.

नेमकं घडलं काय?

रात्री १०:४५ च्या सुमारास दोन अज्ञात हल्लेखोर दुचाकीवरून आले आणि त्यांनी स्कॉर्पिओ कारमध्ये बसलेल्या गँगस्टर जग्गू भगवानपुरियाच्या आई हरजीत कौर आणि बॉडीगार्ड करणवीर सिंग यांच्यावर गोळीबार केला. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. गोळी लागल्यामुळे करणवीर सिंगचा जागीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी झालेल्या हरजीत कौर यांचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला.

पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू आहे. या घटनेचा संबंध गँगवॉरशी असल्याचे स्पष्ट झाले असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

गँगस्टर जग्गू भगवानपुरिया नक्की कोण आहे?

जग्गू भगवानपुरियाचं खरे नाव जसदीप सिंग आहे. दहावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर तो गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळला. शाळा आणि परिसरात तो गुंडगिरी करायला लागला. त्याच्याविरुद्ध आतापर्यंत अनेक एफआयआर नोंदवले गेले आहेत. ध्यानपूरमधील एका हत्या प्रकरणात त्याचं नाव समोर आलं होतं, त्यानंतर तो गुन्हेगारी जगतात सक्रिय झाला. सध्या त्याच्यावर २६ गुन्हे दाखल असून, तो तुरुंगात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अंबरनाथ पश्चिमेत भाजप उमेदवाराच्या कार्यालयावर मध्यरात्री गोळीबार, शहरात खळबळ

Maharashtra Elections:भाजपला रोखण्यासाठी काका-पुतण्या एकत्र? ठाकरेंपाठोपाठ दोन्ही राष्ट्रवादीचीही युती?

KDMC Election: भाजपा–शिवसेना शिंदे गटकाडून युतीचे संकेत; मात्र जागा वाटपाचा तिढा अजूनही गुलदस्त्यात

Kalyan Politics: फोडाफोडीवरून महायुतीत पुन्हा वाद; शिवसेनेनं नगरसेवक पळवल्यानंतर भाजप आक्रमक

Maharashtra Elections: बायको, मुलगा-मुलगी,भाऊ-बहिणींनाच हवीय उमेदवारी; नेत्यांना फक्त आपल्याच घरात हवं तिकीट

SCROLL FOR NEXT