Gang Rape Survivor From Pakistan-Occupied Kashmir Seeks PM Modi's Help Twitter/ @zaara_kashmiri
देश विदेश

Video : आम्हाला भारतात येऊ द्या; POK मधील गॅंगरेप पीडितेनं मागितली मोदींकडे मदत

Maria Tahir Ask Help to PM Modi: मारिया ताहिर असं या बलात्कार पीडिच महिलेचं नाव असून २०१५ साली तिच्यावर काही नराधमांनी सामूहिक बलात्कार केला होता.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नवी दिल्ली: आम्हाला भारतात येऊ द्या, मला आणि माझ्या मुलांना जीवे मारण्याच्या धमक्या आहेत अशी आर्त मदतीची साद पंतप्रधान नरेंद्र मोदींना घातलीये. पाकव्याप्त जम्मू-काश्मीरमधील (POK) एका सामूहिक बलात्कार पीडित (Gangrape Victim) महिलेनं भारताकडे मदत मागितली आहे. या महिलेचा हा व्हिडिओ (Viral Video) सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात ती पंतप्रधान मोदींकडे (PM Modi) मदत मागताना दिसत आहे. मारिया ताहिर असं या बलात्कार पीडिच महिलेचं नाव असून २०१५ साली तिच्यावर काही नराधमांनी सामूहिक बलात्कार केला होता. या घटनेला तब्बल सात वर्षे उलटली तरीही त्या महिलेल्या न्याय मिळाला नाही, त्याउलट तिला आणि तिच्या मुलांच्या जीवाला धोका असल्याचा दावा करत तिला तिच्या मुलांसह भारतात येऊ द्यावे अशी मागणी तिने केली आहे. (Gang Rape Survivor From Pakistan-Occupied Kashmir Seeks PM Modi's Help)

हे देखील पहा -

मारिया ताहिर (Maria Tahir) या पीडितेनं मोदींना विनंती केली आहे की, "या व्हिडिओद्वारे, मी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आवाहन करत आहे की त्यांनी आम्हाला भारतात येण्याची परवानगी द्यावी. माझ्या आणि माझ्या मुलांच्या जीवाला धोका आहे. स्थानिक पोलिस आणि एक ज्येष्ठ राजकारणी चौधरी तारिक फारूख मला आणि माझ्या मुलांना कधीही मारतील असा दावा पाडितेनं केला आहे. तसेच आम्हाला आश्रय आणि संरक्षण देण्यासाठी पंतप्रधान मोदींना विनंती करू इच्छिते,” असं भावनिक आव्हान तिने मोदींना केलं आहे.

मारिया ताहिर यांच्यावर 2015 मध्ये झालेल्या या जघन्य गुन्ह्यात सहभागी असलेल्यांना शिक्षा व्हावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. या गुन्ह्यातील आरोपी हारून रशीद, मामून रशीद, जमील शफी, वकास अश्रफ, सनम हारून आणि आणखी तिघांवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप पीडितेने केला आहे. पण तिला सात वर्षांपासून न्याय मिळाला नसल्यानं तिनं थेट भारताकडे मदत मागितली आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Smallest Country: जगातील असा कोणता देश आहे जिथे फक्त २७ लोक राहतात?

Kokan Nagar Govinda 10 Thar: एकावर एक थर रचत कोकण नगर गोविंदा पथकाने रचला इतिहास, १० थरांची दिली कडक सलामी; पाहा फोटो

Maharashtra Live News Update: बारवी धरण 'ओव्हरफ्लो', धरणाच्या 11 दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग सुरू

Maharashtra Rain Update : कोकणासह घाटमाथ्यावर पावसाचा जोर; पुढील ५ दिवस कसं असेल वातावरण? जाणून घ्या

Money Saving Tips : या 5 गोष्टी तुम्ही चुकूनही खरेदी करु नयेत

SCROLL FOR NEXT