Kuno National Park  Saam Digital
देश विदेश

Kuno National Park : कुनो नॅशनल पार्कमधून गुड न्यूज; 'गामिनी'ने दिला 5 पिलांना जन्म

Mission Cheetah Project : मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये एका मादी चित्तेने आनंदाची बातमी दिली आहे. उद्यानातील गामिनी या मादी चित्तेने 5 पिलांना जन्म दिला आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी याची माहिती दिली आहे.

Sandeep Gawade

Kuno National Park

मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये एका मादी चित्तेने आनंदाची बातमी दिली आहे. उद्यानातील गामिनी या मादी चित्तेने 5 पिलांना जन्म दिला आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर याचे व्हिडीओ आणि पोस्ट शेअर केले आहेत. 5 पिलांच्या जन्मानंतर भारतात जन्मलेल्या पिल्लांची संख्या 13 झाली आहे. देशात 13 शावकांसह बिबट्यांची एकूण संख्या 26 झाली आहे.

मीशन चित्ता अंतर्गत कुनो नॅशनल पार्कमध्ये शावकांना जन्म देणारी मादी चित्ता गामिनी दक्षिण आफ्रिकेतील त्वालू कालाहारी रिझर्व्हमधून भारतात आणली होती. गामिनीतं वय सध्या ५ वर्षे असल्याचं सांगितलं जात आहे. 17 सप्टेंबर 2022 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये नायजेरियातून आठ चित्ते सोडले होते. यासोबतच देशातील नामशेष झालेल्या चित्त्यांच्या पुनर्संवर्धनाचे काम सुरू करण्यात आले. यानंतर 18 फेब्रुवारी 2023 रोजी दक्षिण आफ्रिकेतून 12 चित्ते उद्यानात सोडण्यात आले.

10 चित्त्यांचा वेगवेगळ्या कारणांमुळे मृत्यू

चित्ता प्रकल्पांतर्गत कुनो नॅशनल पार्कमध्ये आणण्यात आलेल्या चित्त्यांपैकी 10 चित्त्यांचा वेगवेगळ्या कारणांमुळे मृत्यू झाला आहे. 16 जानेवारी रोजी शौर्य या चित्त्याचा मृत्यू झाल्यानंतर मृत्य चित्त्यांची संख्या 10 वर पोहोचली होती. यात तीन पिल्लांचाही समावेश होता.मादी चित्ता ज्वालाने 4 पिल्लांना जन्म दिला होता, त्यापैकी 3 शावकांचा मृत्यू झाला. मात्र, ज्वालाचे एक शावक पूर्णपणे निरोगी असून उद्यानातच असल्याची माहिती आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राजकारणातील मोठी बातमी; बंडखोर खासदारांसंदर्भात लोकसभा अध्यक्षांनी घेतला महत्त्वाचा निर्णय

Maharashtra News Live Update: दुष्काळ जाहीर केला मात्र अंमलबजावणी तातडीने करा, शेतकऱ्यांची मागणी

Maharashtra Drought: २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, सरकार काय उपाययोजना करणार? वाचा सविस्तर...

Political News : मोठी बातमी! शिंदे सेनेच्या बड्या नेत्याचा मृत्यू; राजकीय वर्तुळात खळबळ

PF खातेदारांसाठी मोठी संधी! 28 सप्टेंबरला EPFO संदर्भातील अडचणी होणार दूर

SCROLL FOR NEXT