Ram Charan  Saam Tv News
देश विदेश

Ram Charans fans: पुष्पा २ नंतर राम चरणच्या इव्हेंटला गालबोट! २ चाहत्यांचा मृत्यू, निर्मात्यांकडून आर्थिक मदत जाहीर

Ram Charans fans died: गेम चेंजर सिनेमाच्या प्री रिलीज इव्हेंटनंतर अभिनेता राम चरणच्या २ चाहत्यांचा मृत्यू झालाय. कार्यक्रमानंतर २ चाहते दुचाकीवरून घरी जात असताना दुचाकीला धडक बसली, ज्यात त्यांचा मृत्यू झाला आहे.

Bhagyashree Kamble

पुष्पा २ चित्रपटाच्या प्रिमियरदरम्यान चेंगराचेंगरीचं प्रकरण झालं होतं. त्यात एक महिलेचा मृत्यूही झाला होता. या प्रकरणी अल्लू अर्जुनला अटक देखील झाली होती. आता असंच काहीसं प्रकरण गेम चेंजर सिनेमाच्या प्री रिलीज इव्हेंटनंतर घडला आहे. गेम चेंजर सिनेमाच्या प्री रिलीज इव्हेंटनंतर अभिनेता राम चरणच्या दोन चाहत्यांना आपले प्राण गमवावे लागले आहे.

साऊथ मेगास्टार राम चरणचा आगामी गेम चेंजर सध्या चर्चेत आहे. नुकताच या चित्रपटाचा प्री रिलीज इव्हेंट आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात अभिनेता राम चरण आणि त्याच्यासोबत आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री पवन कल्याण देखील उपस्थित होते. या इव्हेंटमध्ये राम चरणच्या चाहत्यांची तुफान गर्दी पाहायला मिळाली. मात्र, त्यातील २ चाहत्यांचा अपघाती मृत्यू झाला आहे.

शनिवारी रात्री झालेल्या कार्यक्रमानंतर २ चाहते दुचाकीवरून घरी जात होते. २३ वर्षीय अरवा मणिकांत आणि २२ वर्षीय ठोकडा चरण अशी दोन चाहत्यांची नावे आहेत. कार्यक्रम झाल्यानंतर ते दोघेही दुचाकीवरून घरी जात होते. मात्र, विरूद्ध दिशेनं येणाऱ्या व्हॅननं त्यांच्या दुचाकीला धडक दिली होती. ही धडक इतकी जबर बसली की यात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे.

घरी परतत असताना त्यांचा भीषण अपघाती मृत्यू झाल्यानं परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या धक्कादायक प्रकरणानंतर गेम चेंजरचे निर्माते दिल राजू यांनी पीडितेच्या कुटुंबाला आर्थिक मदत देऊ केली आहे. त्यांनी अधिकृत एक्स अकांऊटवर पोस्ट करीत १० लाख रूपयांच्या मदतीची घोषणा केली आहे. तसेच दिल राजूने शोक व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope : वाटे वाटेवर अडचणीचा अनुभव यईल; ५ राशींच्या लोकांची देव परीक्षा घेणार, वाचा बुधवारचं राशीभविष्य

Shukra Gochar: 15 सप्टेंबरपासून 'या' राशींचं नशीब फळफळणार; 1 वर्षानंतर शुक्र करणार सूर्याच्या घरात प्रवेश

OBC Protest: मोठी बातमी! सरकारच्या जीआरविरोधात न्यायालयात जाणार, छगन भुजबळांसह ओबीसी नेत्यांमध्ये चर्चा सुरू

Actress : ...मारा, तिचे कपडे काढा, अफेयरच्या अफवांवरुन छळ, मराठी अभिनेत्रीने सांगितला भयानक अनुभव

Manoj jarange patil protest Live: - सरकारच्या जीआर विरोधात ओबीसी नेते न्यायालयात धाव घेणार

SCROLL FOR NEXT