
दक्षिणात्य अभिनेता राम चरण हिंदी चित्रपटसृष्टीत खूप प्रसिद्ध आहे. राम चरणचा बॅलिवूड इंडस्ट्रीमध्ये देखील खूप मोठा चाहता वर्ग आहे. राम चरणने अनेक चित्रपटात काम करुन प्रेक्षकांची मने जिंकली आहे. दमदार अभिनय आणि उत्कृष्ट अॅक्टिंग करणारा अभिनेता एक निर्माता आणि उद्योजक आहे. राम चरण हा एक तेलगु सुपरस्टार आहे. राम चरण नेहमीच चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारताना प्रेक्षकांना पाहायला मिळत असतो. त्याचबरोबर राम चरणचा 'RRR' सारखा चित्रपट खूप सुपरहिट ठरला असून , चाहत्यांची त्या चित्रपटाला खूप पंसती मिळाली होती. त्याबरोबर राम चरण सोशल मिडियावर चाहत्यांसाठी नेहमी नवनवीन फोटो शेअर करत असतो. पण हा तेलगु सुपरस्टार किती कोटी संपत्तीचा मालक आहे, असा प्रश्न सर्वांनाच पडतो. म्हणून आज जाणून घेऊयात राम चरणची एकूण संपत्ती.
सुप्रसिद्ध राम चरणची चित्रपटांव्यतिरिक्त रिअल इस्टेट आणि चित्रपट निर्मितीमध्ये गुंतवणूक आहे. त्याचबरोबर अभिनेत्याचा RRR चित्रपट सुपरहिट ठरला असून, राम चरणला त्या चित्रपटासाठी ४५ कोटी रुपये देण्यात आले होते. अभिनेता राम चरणची प्रोडक्शन कंपनी सुद्धा आहे. राम चरण एका चित्रपटासाठी १२ ते १५ कोटी रुपये घेतो. सर्वाधिक श्रीमंताच्या यादीत असणाऱ्या राम चरणकडे स्वत:ची खाजगी जेट आहे. अभिनेत्याला कारची प्रचंड आवड असल्याने त्याच्याकडे ९,५७ कोटींची रोल्स रॅायम फँटम आहे. त्याचबरोबर मर्सिडीज मेबॅक जीएलएस 600 ४ कोटी रुपयांची आहे. याबरोबर फेरारी पोर्टोफिनो आणि एक अॅस्टन मार्टिन व्हँटेज V8 आहे, ज्याची किंमत सुमारे ३.२ कोटी रुपये आहे.
अभिनेत्याची खूप मालमत्ता असल्याने ज्युबली हिल्स हैदराबाद येथे अलिशान घर आहे. हैदराहादमधील त्या घराची किंमत सुमारे ३८ कोटी रुपये आहे. राम चरणला महागड्या घड्याळ्यांची फार आवड आहे. यामुळे त्याच्याकडे एकापेक्षा एक लक्झरी घड्याळांचे कलेक्शन आहे. अभिनेत्याकडे एकूण ३० लक्झरी घड्याळे आहेत. त्या प्रत्येक घड्याळाची किंमत सुमारे ३० ते ४० लाख असेल. अभिनेता राम टूजेट एअरलाइन्स कंपनीची चेअरमन असून , त्या कंपनीत रामची १२७ कोटींची गुंतवणूक आहे. राम चरणचे मुंबईतील खार परिसरात पेंटहाऊस देखील आहे. त्या पेंटहाऊसची किंमत सुमारे ३० कोटी रुपये आहे. तेलगु सुपरस्टार राम चरणकडे एकूण १,३७० कोटी रुपयांची संपत्ती आहे.