Gadchiroli Naxal News: Police Found Naxalites With AK 47 Rifle of Martyr Jawan Pandey  Saam Digital
देश विदेश

Gadchiroli Naxal News: नक्षलवाद्यांकडे सापडली शहीद जवान पांडे यांची 'एके 47' रायफल, शासनाने लावले होते दहा लाखांचे बक्षीस

Gadchiroli News Update: नक्षलवाद्यांची ओळख पटली असून त्यांच्यावर शासनाने दहा लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. दरम्यान त्यांच्याकडे सापडलेली एके 47 रायफल ही 2012 ला नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या एसआरपीएफ गट क्रमांक चार नागपूरचे जवान पांडे यांची असल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे.

Sandeep Gawade

Gadchiroli Naxal Attack Update:

गडचिरोलीच्या धानोरा तालुक्यातील छत्तीसगड सीमेवर गुरुवारी पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक उडाली. या चकमकीत दोन नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात गडचिरोली पोलिसांच्या सी-60 जवानांना यश आले. आज या दोन्हीही नक्षलवाद्यांची ओळख पटली असून त्यांच्यावर शासनाने दहा लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. दरम्यान त्यांच्याकडे सापडलेली एके 47 रायफल ही 2012 ला नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या एसआरपीएफ गट क्रमांक चार नागपूरचे जवान पांडे यांची असल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे.

ठार झालेला नक्षलवादी कसनसूर दलमचा उपकमांडर दुर्गेश दल्लू बंडू वट्टी हा एटापल्ली तालुक्यातील रहिवासी तर दुसरा राकेश हा बस्तर छत्तीसगड राज्यातील रहिवासी आहे. विशेष म्हणजे दुर्गेश हा 2019 मध्ये जांभुळखेडा स्फोटाचा मुख्य सूत्रधार होता. जांभुळखेडा हल्ल्यामध्ये 15 पोलीस जवान शहीद झाले होते. चकमकीनंतर घटनास्थळावरून एक रायफल, एक एसएलआर बंदूक, दोन वॉकी टॉकी, बॅटरी, टॉर्च, औषधे आणि स्फोटक साहित्य मोठ्या प्रमाणात हस्तगत केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दुर्गेशवर आहेत 33 गंभीर गुन्हे

दुर्गेश 2003 मध्ये गट्टा नक्षल दलममध्ये सदस्य पदावर भरती झाला होता. त्याने भामरागड, पेरमिली, सिरोंच्या या दलममध्ये काम केले. त्यानंतर उपकमांडरचा अंगरक्षक आणि 2014 ला पदोन्नती होऊन उत्तर व दक्षिण गडचिरोली भागाचा उपकमांडर म्हणून काम केले. 2017 ते 2021 दरम्यान कंपनी चारमध्ये उपकमांडर पदावर कार्यरत राहून तो काम करत होता. त्याच्यावर 18 चकमकी, तीन खून, दोन जाळपोळ असे 33 गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर शासनाने 8 रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. तर राकेश हा छत्तीसगड राज्यातील रहिवासी असून त्याच्यावर एक चकमक आणि इतर एक असे दोन गुन्हे दाखल असून त्याच्यावर दोन लाखाचे बक्षीस होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu Tips: वास्तुनुसार 'या' मूर्ती घरात ठेवा, सुख शांती मिळेल

Maharashtra News Live Updates: योगींच्या 'बटेंगे तो कटेंगे' घोषणेला देवेंद्र फडणवीस यांचं समर्थन

Winter Drinks: हिवाळ्यात हे आरोग्यदायी पेय प्या आणि शरीराला ठेवा उबदार

असंख्य घरांमध्ये लपलीये एक मांजर; तुम्ही १० सेकंदात शोधून दाखवाच!

Solapur Airport : सोलापूरकरांसाठी मोठी गुडन्यूज! 'या' तारखेपासून सुरू होणार विमानसेवा, मुंबई-गोव्याला काही तासात पोहचणार!

SCROLL FOR NEXT