lockdown news Saam tv
देश विदेश

G-20 Summit: राजधानी दिल्लीत ३ दिवस 'लॉकडाऊन'; सर्व शाळा आणि सरकारी कार्यालये बंद राहणार

Bank, Schools and Governments Offices will be Closed: राजधानी दिल्ली जी- २० समूहाच्या शिखर परिषदेसाठी सज्ज झाली आहे. जी-२० समूहाची शिखर परिषद ९ आणि १० सप्टेंबर रोजी होणार आहे.

Vishal Gangurde

प्रमोद जगताप

G-20 Summit in New Delhi

राजधानी दिल्ली जी- २० समूहाच्या शिखर परिषदेसाठी सज्ज झाली आहे. जी-२० समूहाची शिखर परिषद ९ आणि १० सप्टेंबर रोजी होणार आहे. या परिषदेला जी २० देशाचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. यंदा जी २० परिषदेचं अध्यक्षपद भारताकडे आहे. या परिषदेदरम्यान, सरकारने सर्व शाळा आणि सरकारी कार्यालयांना ८,९ आणि १० सप्टेंबर रोजी सुट्टी जाहीर केली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची मोठी प्रतिमा निर्माण करण्याची देशाला मोठी संधी असल्याचे बोललं जात आहे. (Latest Marathi News)

काय आहे जी-२०?

जी-२० युरोपीयन युनियनसह २० देशांची संघटना आहे. या २० देशांच्या प्रमुखांची वार्षिक बैठक होते. जी-२० परिषदेला समीट शिखर परिषद म्हणूनही ओळखली जाते. या परिषदेत मुख्य दहशतवाद, आर्थिक समस्या, ग्लोबल वॉर्मिंग, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या विषयांवर देण्यात येतो.

जी २० देशाची आर्थिक ताकद काय?

जी-२० समूह परिषदेत जगभरातील २० देशांचा सामावेश होतो. जगाच्या एकूण अर्थव्यवस्थेत या देशांचा ८० टक्के वाटा आहे.

जी-२० समूह परिषदेतील सदस्य देश कोणते आहे?

जी20 समूहात अर्जेंटीना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, भारत, इंडोनेशिया, इटली, जापान, मेक्सिको, कॅनाडा, सऊदी अरब, दक्षिण अफ्रीका, दक्षिण कोरिया, तुर्की, यूनाइटेड किंगडम, चीन, जर्मनी, फ्रान्स रूस, अमेरिका आणि युरोपीय संघाचा समावेश आहे.

परिषदेला कोण येणार ?

अमेरिकी राष्ट्राध्यक्ष जो बाइडन, इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक, जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो आणि सऊदी अरबचे राजा सलमान बिन अब्दुलअजीज अल सऊद यांच्यासह आमंत्रित देशाचे प्रमुख उपस्थित राहणार आहेत.

शाळा, बँक, कार्यालये बंद राहणार

सरकारद्वारे राजधानी दिल्लीत सुटी जाहीर केली आहे. ८, ९ आणि १० सप्टेंबर रोजी दिल्लीत सरकारी कार्यालये, शाळा, बँका बंद राहतील. तसेच खासगी कार्यालय देखील बंद राहणार आहे. सुप्रीम कोर्ट मेट्रो स्टेशन यावेळी बंद राहणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lakshmi Puja Upay : लक्ष्मीपूजनात करा सोपे वास्तू उपाय,आयुष्यभर पैसा कमी पडणार नाही

Lakshmi Puja 2025: लक्ष्मीपूजनासाठी कलश सजवण्याचे ८ सोपे पर्याय; खायची पानं, फुलं आणि दिव्यांनी सजवा कलश

Maharashtra Live News Update : पुण्यातील सारसबागमध्ये दिवाळी पहाटचा कार्यक्रम होणार

Kalyan : बोगस मतदार व यादीत घोळ; शिवसेना उबाठा आक्रमक, बोगस मतदाराना शिवसेना स्टाइलने धडा शिकविण्याचा इशारा

Actress Accident: चालत्या गाडीवर रॉकेट आला अन्...; प्रसिद्ध अभिनेत्रीचा थोडक्यात जीव वाचला

SCROLL FOR NEXT