Viral Marathi News
Viral Marathi News Saam TV
देश विदेश

Viral News : जावयाचा अजब गजब पाहुणचार! प्रथेच्या नावाखाली सासरच्या मंडळींनी केलं भलतंच कृत्य, पाहा VIDEO

Satish Daud-Patil

Viral Video : लग्न म्हटलं की गडबड गोंधळ आलाच. लग्नसोहळ्यात अनेक विधी आणि प्रथा पार पाडल्या जातात. एकदा की लग्नमंडपात वधू-वराने सात फेरे घेतले. तर बाकीचे मंडळी या प्रथेत गुंतून जातात. कुणी नवरदेव-नवरीवरून ओवाळणी टाकतं. तर कुणी नवरदेवाचा बूट लपवून त्याकडे पैशांची मागणी करतं. यामध्ये नवरीच्या मैत्रीणींचा मोठा सहभाग असतो.

आपल्या देशात लग्नाच्या अनेक विधी आणि प्रथा आहेत. ज्या लग्नाच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशीपर्यंत सुरू असतात. कधीकधी प्रथेच्या नावाखाली वधू वरांकडील मंडळी असं काही कृत्य करतात की जे पाहून अनेकांना हसू आवरत नाही. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

ज्यामध्ये लग्नानंतर एका वरासोबत विचित्र विधी केले जात आहेत. लग्नानंतर सूनेचं घरातील पहिलं पाऊल शुभ मानलं जातं. तिला मोठा मानसन्मान दिला जातो. तसंच नवऱ्या मुलाला सुद्धा नवरीच्या कुटुंबीयांकडून थाटात पाहुणचार केला जातो. त्याला देवासारखा मान दिला जातो.

यामुळेच जावयाला सासरच्या डोक्याचा मुकुट म्हटले जाते, पण कर्मकांड, चालीरीतींच्या नावाखाली काहीजण जावयासोबत असं कृत्य करतात की ते पाहून अनेकांना संताप अनावर होतो. व्हायरल झालेल्या व्हिडीओ पाहून नेटकरी असाच संताप व्यक्त करत आहेत.

व्हिडीओत काय आहे?

व्हायरल झालेल्या व्हिडीओत एक नवविवाहित जोडपं दिसत आहे. यामध्ये चालीरितीच्या नावाखाली सासरचे मंडळी आपल्या जावयाच्या तोंडाला काळा रंग लावत आहे. केवळ नवरदेवच नाही तर त्याचा भाऊ आणि मेव्हणा यांच्या चेहऱ्याला सुद्धा काळा रंग लावला जातोय.

हा संपूर्ण प्रकार इथेच थांबत नाही तर, वधूकडील मंडळी नवरदेवाला मस्करा-बिंदी, पावडर, लिपस्टिक सुद्धा लावताना दिसून येत आहे. एकीकडे सासरचे लोक वराची चेष्टा करत असताना दुसरीकडे वराकडील मंडळी मात्र मुकाट्याने हसत आहेत. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. ज्याला लाखो लोकांनी पाहिले आणि लाईक केले आहे. तर काहींनी व्हिडीओ पाहून संताप व्यक्त केला आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Met Gala 2024मध्ये सौंदर्यवतींच्या नजाकती, फॅशनवर खिळल्या नजरा

PM Modi In Beed: गोपीनाथ यांच्यासोबत माझं घनिष्ट नातं, PM मोदींकडून मुंडेंच्या आठवणींना उजाळा

EVM हॅक करण्यासाठी सुट्टीवर आलेल्या सैनिकाचा अंबादास दानवेंना फोन; कोण आहे मारूती ढाकणे

Live Breaking News : सोलापुरात भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते पुन्हा आमने-सामने

Ambadas Danve News : अडीच कोटीत Evm हॅक! अंबादास दानवेंना कुणी दिली ऑफर?

SCROLL FOR NEXT