भीषण अपघात: अंत्यसंस्कारासाठी जाताना ५ जणांवर काळाचा घाला Saam Tv
देश विदेश

भीषण अपघात: अंत्यसंस्कारासाठी जाताना ५ जणांवर काळाचा घाला

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वृत्तसंस्था : अंत्यसंस्कारासाठी Funeral जात असताना चालकाचे driver कारवरचे नियंत्रण सुटल्यामुळे झालेल्या भीषण Awful अपघातात accident मध्ये एकाच कुटुंबामधील ५ जणांचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेश Uttar Pradesh मधील बस्तीमध्ये काल सकाळी झालेल्या अपघातात कारच्या अक्षरशः ठिकऱ्या उडाले आहेत. NH-28 वर एका हॉटेल Hotel जवळ उभ्या असणाऱ्या कंटेनरला या कारने पाठीमाघून जोरदार धडक दिली आहे.

कारचा संपूर्ण चेंदामेंदा झालेला आहे. या अपघातात एकाच कुटुंबा Family मधील ३ मुली आणि त्यांचे आईवडिल यांचा मृत्यू झाला आहे. तर आणखी १ मुलगी आणि कारचा ड्रायव्हर या अपघातामधून बचावले आहेत. अब्दुल अजीज, त्यांची पत्नी आणि ४ मुली हे मूळचे बिहारी कुटुंब सध्या कामानिमित्त उत्तर प्रदेश मधील शारदा नगर भागात राहत होते.

हे देखील पहा-

अब्दुल अजीज यांच्या सासूबाईंचे निधन झाल्याचे समजल्यावर त्यांच्या अंत्यसंस्कारांसाठी हे कुटुंब कारमधून झारखंडला Jharkhand जात होते. या कारमध्ये या कुटुंबामधील ६ जण आणि ड्रायव्हर असे एकूण ७ जण होते. सकाळच्या सुमारास या झालेल्या भीषण अपघातात अनम (वय- १३ वर्षं) आणि कारचा ड्रायव्हर हे बचावले आहेत.यामध्ये अब्दुल अजीज (वय-५०), नर्गिस तवस्सुम (वय-४८), अनम (वय-१३), तिउरा (वय-१०) आणि सुबा (वय-६) यांचा या अपघातामध्ये मृत्यू झालेला आहे, अशी बातमी दैनिक भास्करने यावेळी दिलेली आहे.

ही धडक इतक भीषण होत, की गॅस कटरचा वापर करून, या सर्वांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. बचावलेल्या २ जणांना तातडीने हॉस्पिटल मध्ये दाखल करून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेबाबत स्वतः शोक व्यक्त केले आहे. सर्व ती मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. एका अंत्यसंस्कारासाठी जात असतानाच या सर्वांवर काळाने घाला घातल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates : गुन्हे मागे घेण्यासंदर्भातील बैठकीत मराठा समाजासोबत दुजाभाव, योगेश केदार यांचा आरोप

PM Modi News Update : पंतप्रधान मोदींचा वाशिम दौरा पुढे ढकलला

Shirur Breaking News : शिरूरच्या घोडेगंगा साखर कारखान्यात राडा!

Dangerous Tourist Destinations : भारतातील सर्वात खतरनाक पर्यटनस्थळे, जाण्यापूर्वी एकदा विचार करा

Mumbai Fight Video: बारच्या वॉचमनशी वाद; कर्मचाऱ्यांनी थेट पोलिसांसमोरच तरुणाला केली बेदम मारहाण, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT