Popular liquor brands under FSSAI scanner 
देश विदेश

मद्यप्रेमींसाठी महत्त्वाची बातमी! ब्रँडेड दारूच्या फ्लेवर्सवर बंदी,काय आहे कारण?

FSSAI Restricts Popular Liquor Brands: आता मद्यप्रेमींसाठी महत्त्वाची बातमी, तुम्ही पित असलेल्या ब्रँडेड दारूवर FSSAIनं बंदी घातलीय. ही बंदी का घालण्यात आलीय? कोणत्या कोणत्या ब्रँडला याचा फटका बसलाय़? पाहूयात या रिपोर्टमधून.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

  • एफएसएसएआयने काही लोकप्रिय ब्रँडेड दारूच्या फ्लेवर्ड उत्पादनांवर निर्बंध लावले.

  • खाद्य सुरक्षा आणि नियामक मानकांचे पालन सुनिश्चित करणे.

  • सर्व प्रकारच्या दारूवर बंदी नाही

पावसाळा असो वा हिवाळा, भारतात दारूच्या लोकप्रिय ब्रँड्सना नेहमीच मोठी मागणी असते. विशेषतः ‘ओल्ड मंक’ सारख्या माफक दरात मिळणाऱ्या ब्रँडचा बाजारात मोठा खप आहे. मात्र ब्रँडेड दारूतच भेसळ होत असल्याचा धक्कादायक प्रकार आता समोर आलाय... भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणानं लोकप्रिय दारूच्या ब्रँड्सच्या विशिष्ट उत्पादनांवर थेट बंदी घालण्याचा निर्णय घेतलाय..मात्र हा निर्णय FSSAIनं का घेतला पाहूयात.

FSSAIची कारवाई कशासाठी?

दारूच्या मूळ चवीत कृत्रिम फ्लेवर्सचा वापर

सुगंध हा मळी, माल्ट, किण्वन प्रक्रिया नैसर्गिकरीत्या नाही

नैसर्गिक प्रक्रियेऐवजी चवहीन न्युट्रल स्पिरीटचा वापर

रम किंवा व्हिस्कीत कृत्रिमरित्या फ्लेवर मिसळतात

ओल्ड मंक XXX रमवर 7 वर्षे जुने ब्लेंडेड लेबलही खोटं आढळलं

मुळात दारू बनवताना नैसर्गिक प्रक्रियेचा वापर न करता, कृत्रिम फ्लेवर्स वापरल्याचं चाचण्यामधून समोर आल्यानं ही बंदी घालण्यात आलीय... त्यामुळे आता व्हिस्की आणि रममध्ये फ्लेव्हर वापरल्यास त्याची माहिती बाटलीवर अधोरेखित करणं बंधनकारक असणार आहे. FSSAIन कोणत्या ब्रँडेड दारूवर बंदी घातलीय,पाहूयात.

या कारवाईनंतर संबंधित कंपन्यांकडून आक्षेपही नोंदवण्यात आलेत. दोन उत्पादक कंपन्यांच्या आक्षेपानंतर FSSAI ने उपलब्ध साठ्याच्या विक्रीला सशर्त परवानगी दिलीय. संबंधित उत्पादनाच्या पँकेजिंगवर त्यात वापरलेल्या घटकांचा स्पष्ट उल्लेख करणं बंधनकारक असणार आहे...ज्यामुळे ग्राहकांची दिशाभूल टाळता येईल. त्यात FSSAI ने मात्र ही कारवाई संपूर्ण दारू उद्योगाच्या विरोधात नसल्याचे स्पष्ट केलंय. केवळ नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ठराविक उत्पादकांवरच कारवाई करण्यात येतेय. त्यामुळे यापुढे जर मद्यपींना फ्लेव्हरयुक्त ब्रँडेड दारू प्य़ायची नसल्यास अस्सल दारूची चव चाखता येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सांगलीमध्ये भीषण अपघात, कार वारणा नदीत कोसळली

Ladki Bahin Yojana: ४ दिवसांत लाडक्या बहि‍णींच्या खात्यात १५०० जमा होणार, ऑगस्टच्या हप्त्याची संभाव्य तारीख समोर

Crime: मार्केटमधून घराकडे निघालेल्या महिलेसोबत भयंकर घडलं, भररस्त्यात पोलिसाने छेड काढली नंतर...

Paan Gulkand Modak Recipe : तोंडात टाकताच विरघळणारा पान-गुलकंद मोदक, गणपतीच्या नैवेद्यासाठी परफेक्ट रेसिपी

High Court : 'Rent’ शब्द वापरल्याने भाडेकरूचा दर्जा मिळत नाही; ३२ वर्षे सुरु असलेल्या खटल्यावर हायकोर्टाचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT