Cylinder Saam Tv
देश विदेश

LPG Price: आजपासून एलपीजी सिलेंडर 105 रुपयांनी महाग

एलपीजी सिलिंडरचे दर 105 रुपयांनी वाढून 2,012 रुपयांवर पोहोचले आहेत.

वृत्तसंस्था

नवी दिल्ली - सरकारने आजपासून (1 मार्च 2022) व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत मोठी वाढ केली आहे. दिल्लीत आजपासून व्यावसायिक एलपीजी सिलिंडरचे दर 105 रुपयांनी वाढून 2,012 रुपयांवर पोहोचले आहेत.

सरकारी तेल विपणन कंपन्यांनी सांगितले की, दिल्लीत 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत 105 रुपयांनी वाढवण्यात आली आहे. नवे दर आजपासून लागू झाले आहेत. या वाढीनंतर हॉटेल-रेस्टॉरंटवर भार पडणार असून त्याचा फटका ग्राहकांनाही बसू शकतो. 1 फेब्रुवारी रोजी कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत 91.50 रुपयांनी कमी केली होती.

हे देखील पहा -

छोट्या सिलिंडरच्या दरात मोठी वाढ

सरकारी तेल कंपन्यांनी 5 किलोच्या छोट्या एलपीजी सिलेंडरच्या दरात मोठी वाढ केली आहे. आता दिल्लीत 5 किलोचा एलपीजी सिलिंडर 27 रुपयांनी महागला आहे. त्यामुळे आता 5 किलोच्या एलपीजी सिलिंडरसाठी 569 रुपये मोजावे लागणार आहे.

घरगुती एलपीजी सिलिंडरचे दर वाढले नाहीत

6 ऑक्टोबर 2021 पासून घरगुती LPG सिलिंडर स्वस्त किंवा महाग झालेले नाहीत. मात्र, या काळात कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल १०२ डॉलरच्या पुढे गेल्या आहेत. मात्र, या काळात व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत लक्षणीय बदल झाला. ऑक्टोबर 2021 ते 1 फेब्रुवारी 2022 दरम्यान व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीत 170 रुपयांनी वाढ झाली. 1 ऑक्टोबर रोजी दिल्लीत व्यावसायिक सिलेंडरची किंमत 1736 रुपये होती. त्यानंतर सिलेंडरची किंमत नोव्हेंबरमध्ये 2000 आणि डिसेंबरमध्ये 2101 रुपये झाली. यानंतर, जानेवारी आणि फेब्रुवारी 2022 मध्ये सिलेंडरच्या किंमती कमी झाल्या होत्या तेव्हा व्यावसायिक सिलेंडरचे दर 1907 रुपयांवर आले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Toll Tax : खराब रस्त्यांवर टोल वसुली नाही; सुप्रीम कोर्टाचा महत्वपूर्ण निर्णय

Maharashtra Rain Live News : महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल जाहीर

‘कौन बनेगा करोडपती 17’ ला पहिला करोडपती मिळाला; उत्तराखंडाचा आदित्य कुमारने जिंकली इतकी रक्कम

Viral Video : गोळ्या घालेन... पिस्तूल रोखत धमकावले, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बड्या नेत्याचा कार वर्कशॉपमध्ये राडा

House Renting: घर भाड्याने देताना 'या' महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा

SCROLL FOR NEXT